महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना : आजार कोणते, आर्थिक लाभ किती मिळतो?

Mahatma fule jan arogy Yojana

दारिद्यरेषेखालील आणि प्राधान्याने पिवळ्या   व    केशरी शिधापत्रिकाधारकांना तसेच अन्त्योदय अन्न योजना आणि अन्नपूर्णा योजना शिधापत्रिकाधारक आदींना   सर्वोत्तम    व अत्याधुनिक वैद्यकीय सेवा मोफत मिळावी यासाठी ही योजना थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १२५   व्या पुण्यतिथीनिमित्त २ ऑक्टोबर २०१६ पासून सुरू करण्यात आली आहे . विशेष म्हणजे औरंगाबाद आणि अमरावती विभागातील ( मराठवाडा व पूर्व विदर्भ ) तसेच वर्धा जिल्ह्यातील ( शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हे ) शुभ्र शिधापत्रिकाधारकांनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे .

 महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना स्वरूप


या योजनेअंतर्गत सुमारे ११०० प्रकारच्या उपचारांचा मोफत लाभ घेता येतो . त्यामध्ये कर्करोग , बालक आणि वृद्धांवरील उपचार , ( Hip & knee replacement ) सिकलसेल , अॅनिमिया , डेंग्यू , स्वाइन फ्ल्यू आदींवरील उपचारांचा समावेश आहे .

या योजनेतील उपचार पुढीलप्रमाणे :

★ जनरल सर्जरी

★ कान – नाक – घसा शस्त्रक्रिया

★ डोळ्यांच्या शस्त्रक्रिया

★ स्त्रीरोग व प्रसूतीविषयक शस्त्रक्रिया

★ सांधे व अस्थिविकारविषयक शस्त्रक्रिया

★ जठर व पचनेंद्रियांसंदर्भातील शस्त्रक्रिया

★ हृदयरोग शस्त्रक्रिया * बालरुग्णांवरील शस्त्रक्रिया * जेनिटोयुरीनरी सिस्टम

★ मज्जासंस्थाविषयक शस्त्रक्रिया विविध प्रकारच्या गाठींवरील शस्त्रक्रिया मेडिकल ऑन्कॉलॉजी

★ रेडिएशन ऑन्कॉलॉजी प्लास्टिक सर्जरी भाजल्यावरील उपचार पोली ट्रॉमा प्रोस्थेसीस

★ अतिदक्षता

★ सर्वसामान्य औषधे

★ संसर्गजन्य आजार

★ लहान मुलांचे वैद्यकीय व्यवस्थापन

★ हृदयविकार

★ नेफ्रोलॉजी न्यूरोलॉजी

★ पल्मोनॉलॉजी जीवजंतूसंसर्ग रेमेटॉलॉजी

★ एंडोक्रोनॉलॉजी  गॅस्ट्रोएंट्रॉलॉजी

★ इंटर्वेशनल रेडियोलॉजी आदी शस्त्रक्रिया वा उपचारांचा लाभ या योजनेअंतर्गत घेता येतो .

कोणासाठी : उपभोक्ता कुटुंब : खालील अटी पूर्ण करणाऱ्या , राज्यातील सर्व कुटुंबांना या योजनेचा लाभ घेता येतो .

१ ) पिवळी शिधापत्रिका धारक

२ ) अंत्योदय अन्नयोजना कार्ड

३ ) अन्नपूर्णा कार्ड

४ ) केशरी शिधापत्रिका धारक .

शासनातर्फे उपभोक्ता कुटुंबाला ‘ राजीव गांधी आरोग्य ओळखपत्र ‘ देण्यात येते . त्याचे वाटप मुख्यतः पिवळ्या व केशरी शिधापत्रिका व आधार कार्ड यांच्या आधारे होते . आधार कार्ड व अनुक्रमांक नसल्यास व्यक्तीची शिधापत्रिका किंवा पासपोर्टचा उपयोग केला जातो . अपवादात्मक परिस्थितीत योजनेचे कार्ड नसले तरीही पिवळ्या किंवा केशरी रेशनकार्डाद्वारे या योजनेचा लाभ मिळवता येतो .

आपत्कालीन परिस्थितीत दवाखान्यामधील दाखल्याच्या आधारे रुग्णाला तात्पुरत्या स्वरूपाच्या औषधोपचारांची परवानगी दिली जाते . रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताना रुग्णांनी ओळखपत्र दाखवणे गरजेचे असते . नवजात अर्भकाच्या छायाचित्राबरोबर पालकांचा फोटो व शिधापत्रिका या सोबत अर्भकाचा जन्मदाखला जोडून वैद्यकीय सेवेचा लाभ घेता येतो .

आर्थिक लाभ रक्कम मर्यादा :

योजनेअंतर्गत रुग्णालयामध्ये भरती झाल्यानंतर जास्तीत जास्त दोन लाखापर्यंतचा खर्च एका आर्थिक वर्षात एका कुटुंबाला देता येतो . तसेच मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ही मर्यादा प्रतिवर्ष / प्रतिकुटुंब तीन लाखांची आहे . ( यात दात्याच्या शस्त्रक्रियेचाही समावेश आहे . ) यासाठी अधिकृत रुग्णालयामध्ये पैसे न भरता वैद्यकीय सेवा घेता येईल . ही रक्कम एका व्यक्तीसाठी किंवा संपूर्ण कुटुंबासाठी वापरता येऊ शकते .

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी २,५०,००० रुपयापर्यंत लाभ देण्यात येतो . नियोजित दर : या योजनेअंतर्गत नियोजित वैद्यकीय सेवांचा लाभ पॅकेज स्वरूपात अधिकृत रुग्णालयात लाभार्थींना घेता येतो .

यात पुढील वैद्यकीय सेवांचा समावेश करण्यात आला आहे :

★राहण्याचे शुल्क ( सर्वसाधारण कक्ष )

★ परिचारिका शुल्क  शल्यविशारद शुल्क भूलतज्ज्ञ वैद्यकीय

★ तपासणी शुल्क

★ भूल , रक्त , ऑक्सिजन , शस्त्रक्रिया कक्ष शुल्क , उपकरणे व औषधे

कृत्रिम अवयव रोपण , क्ष किरण आणि रोगनिदान चाचणी परिवहन मंडळाच्या दरांप्रमाणे परिवहन शुल्क ( रुग्णालय ते घर ) आदी सर्व खर्च या योजनेअंतर्गत दिला जाईल .

विम्याची ऑनलाइन भरपाई : विम्याची भरपाई कागदपत्रांची पूर्तता केल्यावर सात दिवसांत करण्यात येते .

आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :

१ ) सर्व मूळ बिले

२ ) तपासणी चाचणी निदान

३ ) वैद्यकीय अधिकाऱ्याने प्रमाणित केलेले डिस्चार्ज पत्रक

४ ) आजाराशी निगडित इतर गरजेची कागदपत्रं ह्या पूर्ण प्रक्रियेचे निरीक्षण व तपासणी ‘ राजीव आरोग्यदायी सोसायटी’तर्फे केली जाईल .

योजना : माझ्यासाठी , समाजासाठी …

Spread the love

Leave a Comment