सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराचे ” मंगळवेढ्यात दिमाखदार वितरण संपन्न!

प्रतिनिधी ( बातमी.in टीम ) : स्वातंत्र्याच्या अमृतमोहोस्तवी वर्ष निमित्ताने सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार” वितरणाचे आयोजन मंगळवेढा येथे दि. ६ मे रोजी करण्यात आले होते. यावेळी विविध क्षेत्रात विशेष कामगिरी केलेल्या पाच मान्यवर व्यक्तींना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्काराने ” गौरवण्यात आले. यावेळी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. सुभाष बापू देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दत्तात्रय भुसे ( यशस्वी उद्योजक ), दत्तात्रय वाघ ( उपक्रमशील शिक्षक ), कल्पेश कांबळे ( संगीत विशारद ), दिनेश लेंगरे ( प्रगतशील शेतकरी ), सुहास आसबे ( उत्तम खेळाडू ) या पाच व्यक्तीना ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार ” मान्यवरांच्या हस्ते प्रदान कारण्यात आला. आपल्या क्षेत्रात उतुंग, उल्लेखनीय कार्य करणारी लोक ही त्या गावची, तालुक्याची आणि जिल्ह्याची खरी श्रीमंती असते.

यांच्या मूळे आपल्या जिल्ह्याला विकासात्मक दृष्टी, नावालौकिक प्राप्त होतो, म्हणून यांना आज ” श्रीमंती सोलापूरची पुरस्कार ” प्रदान करताना मनस्वी आनंद होतो आहे, असे प्रतिपादन यावेळी मा. आ. सुभाष बापू देशमुख यांनी मार्गदर्शन करताना केले.

मंगळवेढ्याचा विकास हा शिर्डीच्या धर्तीवर होणे अपेक्षित आहे, संतांची भूमी म्हणून जगभरात ओळख होण्यासाठी मंगळवेढ्याचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे आणि त्यासाठी सोलापूर सोशल फॉउंडेशन ही सदैव प्रयत्न करीत राहिल.
         – मा. आ. सुभाष बापू देशमुख

यावेळी सल्लागार हरिभाऊ यादव, गटविकास अधिकारी आनंद लोकरे, कृषभूषण अंकुश पडवळे, जयदीप रत्नपरखी, समन्वयक विजय कुचेकर, विपुल लावंड व श्रोते मोठया संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थितीत होते.

Spread the love

Leave a Comment