पहिली ते आठवीच्या शालेय पाठ्यपुस्तकात लेखनासाठी कोरी पाने असणार – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

प्रायोगिक तत्त्वावर पाठयपुस्तके तयार,जाणून घ्या सविस्तर वृत्त.

शालेय शिक्षणमंत्री पदाची सूत्रे घेतल्यानंतर दिपक केसरकर यांनी
या विभागातील सर्व विभागांची आढावा बैठक बुधवारी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळात घेतली. यावेळी विविध विषयास राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पाठयपुस्तका विषयक महत्वपूर्ण निर्णय झाला आहे. या नुसार पुढील वर्षापासून पाठयपुस्तकातच लेखनासाठी कोरी पाने असलेली पाठयपुस्तके दिली जाणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली.

दरम्यान पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना सत्रा नुसार या पुस्तकाचे तीन किंवा चार भाग असतील. त्यामुळे विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझेही कमी होण्यास मदत होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर काही पाठयपुस्तके तयार करण्यात आल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी दिली आहे.

सदर बैठकीस शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी, सचिव अनुराधा ओक, बालभारतीचे संचालक कृष्णकुमार पाटील, माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक महेश पालकर यांच्यासह उपसंचालक, शिक्षणाधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Comment