Protsahan Anudan Yadi : शेतकऱ्यांसाठी खुशखबर! 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदानाची यादी आली, असे चेक करा आपलं नाव

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना (Yojana) अंतर्गत महाविकास आघाडी सरकारने सत्तेत आल्यानंतर राज्यातील शेतकरी बांधवांची (Farmer) दोन लाखांपर्यंतची कर्जमाफी केली होती . तसेच ज्या शेतकऱ्यांनी नियमित पीक कर्जाची परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून अनुदान (Subsidy) देण्याचा निर्णय देखील त्या वेळी तत्कालीन सरकारने घेतला होता . तो निर्णय शिंदे सरकार पुढे राबवीत आहे. सन 2017-18, 2018-19, 2019-20 या तीन वर्षापैकी किमान दोन वर्ष कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान दिले जाणार आहे. दरम्यान आता या अनुदानासाठी पात्र शेतकरी बांधवांच्या याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत.

असे पहा शेतकऱ्यांनो 50 हजार रुपये प्रोत्साहनपर यादीतआपले नाव – 

  1. आपले सरकार सेवा केंद्र किंवा सीएससी सेंटरला भेट द्यावी व सीएससी सेंटरवर शेतकरी आधार कार्डचा उपयोग करून आपले यादीत नाव खालील पद्धतीने चेक करू शकतो –
  2. प्रोत्साहनपर अनुदानाच्या यादीत नाव पाहण्यासाठी सर्वप्रथम सीएससी पोर्टलला लॉगिन घ्यावे लागणार आहे.
  3. लॉगिन घेतल्यानंतर त्या ठिकाणी दिसत असलेल्या सर्च या ऑप्शन मध्ये ‘महात्मा’ हे नाव सर्च करायचं आहे.
  4. यानंतर त्या ठिकाणी एक लिंक दिसेल ज्यावर महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना असं नाव असेल तेथे क्लिक करा.
  5. यानंतर शेतकरी बांधवांना महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना या पोर्टलवर नेल जाईल. या ठिकाणी आधार ऑथेटीकेशन लिस्ट डाउनलोड (Adhar Authentication List) हा ऑप्शन दिसणार आहे.
  6. त्यावर क्लिक केल्यानंतर सर्व जिल्ह्यातील लाभार्थी शेतकऱ्यांची यादी समोर येणार आहे. त्यानंतर शेतकरी बांधव आपल्या जिल्ह्यातील यादी डाऊनलोड करून त्यामध्ये आपले नाव शोधू शकणार आहेत.
  7. यादीमध्ये दिलेली माहिती मध्ये जर काही तफावत असेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर संबंधित बँकेत जाव लागणार आहे.
  8. आणि जर यथायोग्य असेल तर शेतकरी बांधवांना लवकरात लवकर केवायसी करावी लागणार आहे. यासाठी शेतकरी बांधव बँकेत तसेच सीएससी पोर्टलवर केवायसी करू शकणार आहेत.
Spread the love

Leave a Comment