‘ एकच मिशन ओबीसीमधून मराठा आरक्षण ‘ या ठिकाणी निघणार १ लाख मराठा बांधवाचा मोर्चा.

उस्मानाबाद : मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा अनेक दिवसापासून प्रलंबीत आहेत. माघील काळात सत्तातर झाल्या नंतर मराठा समाजाच्या आरक्षणाचा व इतर मागण्या निकालीत लागतील असे वाटत होते. मात्र त्या दिशेने कोणती ही कृती विद्यमान सरकार कडून होताना दिसत नाही. त्यामुळे ओबीसी कोट्यामधून आरक्षण मिळावे यासह अन्य प्रमुख मागण्यांसाठी कळंब सकल मराठा समाजाच्या वतीने सोमवारी १ लाख मराठा बांधवाच्या उपस्थित उपविभागीय अधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात येणार आहे.

दरम्यान सदर मोर्च्याच्या पार्शवभूमीवर काल सकाळी अकरा वाजता भव्य अशी शिस्तबद्धरित्या समाजातील नागरिक, विद्यार्थ्यांची शहरातून रॅली काढण्यात आली. सकल मराठा समाजाच्या वतीने ” एक मराठा,लाख मराठा” अशा घोषणा देत जनजागृती कारण्यात आली.

इतर मार्ग थप झाल्याचे दिसत असताना आता मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे यासाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. सदर समाज्याच्या अनेक समस्या, प्रश्न प्रलंबित आहेत. विद्यार्थ्यांना अनेक अडचणी येत असताना शासनाकडून त्या सोडवण्याच्या दृष्टीने प्रयत्न होत नाही. त्यामुळे सदर गोष्टींकडे शासनाचे लक्ष वेदण्यासाठी हा महामोर्चा आयोजित कारण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती तयारी सकल मराठा समन्वयक समितीकडून करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Comment