राज्यातील सर्व विद्यार्थ्यांना आता त्यांच्या शाळेतच मिळणार जात प्रमाणपत्र…

राज्यातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी आहे. सप्टेंबरपासून 2 ऑक्टाेबरपर्यंत महाराष्ट्र शासन ‘सेवा पंधरवडा’ म्हणून साजरा करीत असून राज्य शासनाच्या विविध विभागाकडून अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत. यांचाच एक भाग म्हणून राज्याच्या समाज कल्याण विभागा मार्फत आता शाळेतच जात प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले जाणार असल्याची माहिती सदर विभाग प्रमुख आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिली आहे.

राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांमध्ये हा उपक्रम राबवला जाणार आहे. विद्यार्थ्यांकडून सगळी कागदपत्रे जमा करुन घेतली जाणार असून, त्यानंतर सात दिवसांत जात प्रमाणपत्र दिले जाणार आहे.राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना तशी माहिती देण्यात आली आहे.

जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी काही कागदपत्रे विद्यार्थ्यांना संबंधित विभागाच्या दक्षता पथकांला पुरावावी लागणार आहे. यामुध्ये संबंधित विद्यार्थ्यांना आपल्या आजोबांचे किंवा वडिलांचे दाखले, रहिवासी दाखले आदी कागदपत्रे शाळेतच द्यावी लागतील. दक्षता पथकांकडून या कागदपत्रांची शाळांमध्येच पडताळणी केली जाईल. त्यानंतर विद्यार्थ्यांना सात दिवसांत जात प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.

Spread the love

Leave a Comment