सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने मारापुरात बांबू लागवड कार्यशाळा संपन्न.

मंगळवेढा : पर्यावरण, नदी संवर्धन, शेती, उद्योग तसेच बांधकाम क्षेत्रात बांबूला महत्त्व असल्यामुळे शासन, खासगी संस्था बांबू लागवडीला चालना देत आहेत. शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबणे आवश्यक आहे. यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथे सोलापूर सोशल फाउंडेशनच्या वतीने आ. सुभाष बापू देशमुख यांच्या अध्यक्षेते खाली बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळेचे आयोजन कारण्यात आले होते. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी अध्यक्ष पाशा पटेल यांची प्रमुख उपस्थिती होती.

शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धतीला फाटा देऊन, बांबू सारख्या पिकांची लागवड करावी. बांबू मध्ये मोठया प्रमाणात संशोधन होत असून, येत्या काळात बांबू वरदायनी पीक ठरेलं. शेतकऱ्यांसाठी सोलापूर सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून अशा मार्गदर्शन कार्यशाळा सातत्याने जिल्हाभर राबविण्यात येतील.

आ. सुभाष बापू देशमुख( संस्थापक अध्यक्ष – सोलापूर सोशल फाउंडेशन )

बांबूला एकविसाव्या शतकातील हिरवे सोने म्हणले जात आहे. सध्याच्या बाजारापेठेनुसार या उत्पादनाला जागेवर टनाला ऊसा पेक्षा जास्त दर मिळत आहे. एकदा लागवड केल्यावर पुढे ८० ते १०० वर्षे उत्पादन घेता येते. बांबूपासून विविध मूल्यवर्धित उत्पादनांची निर्मिती केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आर्थिक उन्नतीसाठी अन्य पिकांबरोबरच शाश्वत व हमखास उत्पन्न देणाऱ्या बांबू लागवडीचा पर्याय अवलंबणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन पाशा पटेल यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना केले.

बांबूच्या रूपाने एक चांगले पीक शेतकऱ्यांसाठी उपलब्ध झाले आहे. पुढील काळात बांबूची शेती करण्यावर शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे. त्या दृष्टीने लागवड, जोपासना, मार्केट इत्यादी विषयक आवश्यक मार्गदर्शन सदर कार्यशाळेत शेतकऱ्यांना कारण्यात आले. यावेळी मोर्फाचे अध्यक्ष अंकुश पडवळे, मुख्य समन्वयक विजय पाटील, हरिभाऊ यादव, विक्रम यादव, पांडुरंग आसबे, मोहोन यादव, बापूसाहेब आसबे, अशोक पाटील, अमोल माने, विठ्ठल यादव सर, राजकुमार यादव, विनायक यादव, पोपटराव अनपट, आनंदराव पाटील, समाधान पाटील, अनिल वगरे, फकडं वगरे, तानाजी टिकूरे, चंद्रकांत यादव, समन्वयक विजय कुचेकर इ. व शेतकरी वर्ग मोठया संख्येने उपस्थित होते.

Spread the love

Leave a Comment