मोठी बातमी – पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा शिंदे सरकारचा निर्णय.

महाराष्ट्र राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. वर्षभर अविरत पणे आपली सेवा बजावणाऱ्या पोलीसांच्या विविध सण आणि उत्सवाच्या नैमित्तिक रजा वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिंदे सरकाने घेतला आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते.

राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षक यांच्या नैमितिक रजा ह्या पूर्वी १२ इतक्या होत्या त्यात वाढ करून, त्या रजा २० इतक्या कारण्यात आल्या आहे. त्यामुळे पोलिसां आता आणखी दिलासा मिळणार आहे.

या अगोदर पाचव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना एक वर्षात १२ ऐवजी ८ रजा मंजूर करण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. त्यानंतर त्याअनुषंगाने विशेष बाब म्हणून पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांना १२ दिवस नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आल्या. मात्र, पोलिसांवरील कामाचा वाढता ताण लक्ष्यात घेता या नैमित्तिक रजा आणखी वाढवून २० दिवस करण्याची विशेष बाब म्हणून मंजूर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

Spread the love

Leave a Comment