मोठी बातमी! नव्या वर्षातील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, कर्मचाऱ्यांना मिळणार ‘इतक्या’ दिवस सुट्ट्या..

राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 2023 वर्षातील मधील सार्वजनिक सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. यंदाच्या नवीन वर्षात सरकारी कर्मचाऱ्यांना एकूण 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. मात्र, त्यातील चार सुट्ट्या शनिवारी व रविवारी आल्यामुळे बुडाल्या आहेत

यामध्ये नवीन वर्षात महाशिवरात्र, रमझान ईद व मोहरम हे मोठे सण शनिवारी, तर छत्रपती शिवाजी महाराज जयंती व दिवाळी लक्ष्मीपूजन रविवारी आले असून, त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या या हक्काच्या चार सुट्ट्या बुडाल्या आहेत.

सार्वजनिक सुट्ट्यांची यादी पुढीलप्रमाणे आहे.

▪️ 26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन

▪️ 18 फेब्रुवारी – महाशिवरात्री

▪️ 19 फेब्रुवारी – छत्रपती शिवाजी महाराज जयंती

▪️ 7 मार्च – होळी (रंगपंचमी)

▪️ 22 मार्च – गुढीपाडवा

▪️ 30 मार्च – रामनवमी

▪️ 4 एप्रिल – महावीर जयंती

▪️ 7 एप्रिल – गुड फ्रायडे

▪️ 14 एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती

▪️ 1 मे – महाराष्ट्र दिन

▪️ 5 मे – बुद्ध पौर्णिमा

▪️ 28 जून – बकरी ईद

▪️ 29 जुलै – मोहरम

▪️ 15 ऑगस्ट – स्वातंत्र्यदिन

▪️ 16 ऑगस्ट – पारसी नववर्ष दिन

▪️ 19 सप्टेंबर – गणेश चतुर्थी

▪️ 28 सप्टेंबर – ईद ए मिलाद

▪️ 2 ऑक्टोबर – महात्मा गांधी जयंती

▪️ 24 ऑक्टोबर – दसरा

▪️ 12 नोव्हेंबर – दिवाळी लक्ष्मीपूजन

▪️ 27 नोव्हेंबर – गुरूनानक जयंती

▪️ 27 डिसेंबर – ख्रिसमस

Spread the love

Leave a Comment