
नवीन शैक्षणिक धोरण अंतर्गत राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा केंद्रातून आखाला जात आहे. समर्पक आणि अर्थपूर्ण शालेय शिक्षण बनवण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. बदलत्या धोरणा अंतर्गत इयत्ता १० वी व १२ वीच्या बोर्ड परीक्षेचा पॅटर्न बदलला जाणार आहे. यासाठी सरकारने विद्यार्थी आणि पालकांकडून त्यांचे मत मागितले आहे . ( Board Exam )
दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने बोर्ड परीक्षा 10 मुद्द्यावर पालक , शिक्षक त्याचबरोबर अभ्यासकासह सर्वसामान्य नागरिकांकडून मत मागवले आहेत . बोर्डाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांची खरी क्षमता तपासता येत नाही , असे तुम्हाला वाटते का ? सध्या होत असलेल्या परीक्षेत थोडासा बदल करण्याची गरज आहे का ? किंवा बोर्डाच्या परीक्षेची जी पद्धत सुरू आहे ती तशीच राहू द्यावी, आशा विविध प्रश्नाचा समावेश यात कारण्यात आला आहे.
बोर्ड परीक्षा पद्धती बदलण्या अगोदर सर्व्हेक्षण केले जाणार आहे. सर्व्हेक्षणादरम्यान विद्यार्थी व पालक, इतर व्यक्ती यांना १० मुद्द्याला अनुसरून प्रश्न विचारले जाणार आहेत. याशिवाय कोरोना प्रादुर्भावामुळे शिक्षणावर झालेल्या परिणामांचा देखील विचार करून उपाययोजना काय करता येतील या संदर्भात देखील मते मागवली जाणार आहेत, कोणता उपाय केला पाहिजे ? शालेय शिक्षणाचा आणखी कोणता विद्यार्थ्यांना फायदा होऊ शकतो ? असे अनेक प्रश्न विद्यार्थी , पालक आणि सर्वसामान्य नागरिकांना विचारण्यात आले आहेत अशी माहिती समजते.