ब्रेकिंग बातमी – शिवसंग्रामचे विनायक मेटे यांचे अपघाती निधन, मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला.

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांचं निधन झालं आहे. सकाळी 5.30 वाजताच्या सुमारास त्यांच्या गाडीला भीषण अपघात झाला होता. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं.यामध्ये विनायक मेटे गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे-वर ही घटना घडली. त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे, मराठा आंदोलनाचा बुलंद आवाज हरपला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.

अपघातानंतर विनायक मेटेंना पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात दाखल करण्यात आलं होते . त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, मेटे यांच्या गाडीने अनोळखी वाहनाला धडक दिली. विनायक मेटे यांचा मुलगा गाडी चालवत होता. यामध्ये त्यांचा मुलगाही किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे. या भीषण अपघातात विनायक मेटेंचा सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. पनवेलच्या एमजीएम रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

Spread the love

Leave a Comment