ब्रेकिंग बातमी – ग्लोबल टीचर अवॉर्ड विजेते शिक्षक रणजीत डिसले यांचा नोकरीचा राजीनामा!

सोलापूर ( बातमी.in) : ग्लोबल टीचर अवॉर्ड मिळालेले सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी आज अखेर आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. सदर वृत्त समोर आल्या नंतर शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ माजली आहे. रणजीतसिंह डिसले गुरुजी यांनी माढा तालुका प्रशासनाकडे त्यांनी राजीनामा सुपूर्द केला आहे.

 

प्राथमिक शिक्षण अधिकारी लोहार यांच्याकडे ही पोस्टाद्वारे आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान अमेरिकेतील फुलब्राइट संस्थेची शिष्यवृत्ती डिसले गुरुजींना मिळाली आहे. त्यासाठी ते पुढील शिक्षणासाठी 8 ऑगस्ट रोजी रवाना होणार आहेत.

 

शिक्षण अधिकारी किरण लोहार व डिसले गुरुजी वाद!

लेट्स क्रॉस द बॉर्डर या उपक्रमाच्या माध्यमातून ते जगभरातील अशांत देशातील मुलांना एकत्र आणून त्यांच्यात अहिंसेच्या विचारांचा प्रसार करण्याचे काम ते करत असून सदर विषयावर अधिक संशोधन करण्यासाठी त्यांना पूर्ण वेळ हवा आहे. यासाठी त्यांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला आहे. अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप रणजितसिंह डिसले यांना जाहीर झाली आहे . हीत्यांच्या सोबतच संपूर्ण जगभरातील एकूण 40 शिक्षकांना यंदा ही कॉलरशिप देण्यात आली आहे.

Spread the love

Leave a Comment