ब्रेकिंग बातमी! उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांची उद्या महत्वाची बैठक.

दि. 4 डिसेंबर ( बातमी.इन टीम ): राज्याच्या राजकारणामधील मोठी घडामोड होते आहे. उद्या प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात महत्वाची प्राथमिक बैठक होणार आहे. सदर बैठक ही दुपारी 12 वा. हॉटेल महालक्ष्मी होणार असून, ठाकरे गटाचे नेते सुभाष देसाई देखील उपस्थित असतील अशा स्वरूपाची माहिती आहे. त्यामुळे या दोन्ही मोठ्या नेत्यांमध्ये कशा स्वरूपाची चर्चा होते का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण राज्याच्या राजकारणात एक मोठी अशी घटना जी आहे जी राज्यातील राजकारणाला मोठी कालटनी ठरु शकते.

काही दिवसांपूर्वी प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या कार्यक्रमानिमित्त एका मंचावर आले होते त्यावेळेस देखील उद्धव ठाकरेंच्या वतीने संकेत देण्यात आले होते. भाजपची मुकाबला करण्यासाठी आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि त्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांच्या वतीने मध्यंतरी एक प्रश्न घेऊन सांगितलं गेलं होतं की वंचित बहुजन आघाडी शिवसेनेसोबत आज निवडणूक करण्यासाठी तयार असल्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली होती मात्र निर्णय शिवसेनेला करायचा आहे.

मुबंई महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक खूप महत्त्वाची मानली जात आहे. या दोन नेत्यांमध्ये सकारात्मक चर्चा झाली तर वंचित बहुजन आघाडी व ठाकरे गट हे एकत्रित येणाऱ्या आगामी सर्व निवडनुका लढावल्या जातील. त्यामुळे उद्याच्या या बैठकी कडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

Spread the love

Leave a Comment