
BATAMI.IN टीम
मुंबईः आपल्या वादग्रस्त वक्तव्याने माघील काही दिवसापासून चर्चेत असणारे महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) लवकरच राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्राकडून पुढे आली आहे. नुकतेच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात एक चुकीच वक्तव्य करुन मोठा वाद ओढवून घेतला होता. या नंतर त्यांच्यावर अनेक राजकीय, सामाजिक व्यक्तींनी टिकीची झोड उठवली होती. थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशज यांनी सुद्धा याचा निषेध करीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनामाची मागणी केली होती. आता स्वतः कोश्यारी यांनी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केल्याची माहिती समोर आली.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सातत्याने आपल्या वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत आणि अडचणीत आले आहेत. पाठीमागे सावित्रीबाई फुले वादग्रस्त वक्तव्य केल्याने ते अडचणीत आले होते. याशिवाय सावित्रीबाईंचे लहान वयात लग्न, गुजरातींचा पैसा काढून घेतला तर मुंबईत काही उतरणार नाही अशी वक्तव्य त्यांनी केली होती, त्या नंतर मोठा वाद उफाळून आला होता.
आता मात्र छत्रपती शिवाजी महाराज महाराज यांच्या संदर्भातील वक्तव्यानंतर त्यांना पदमुक्त करावे अशी मागणी महाराष्ट्र राज्यात जोर धरताना दिसते आहे. याच पार्शवभूमीवर अंतर्गत सूत्रच्या माहिती नुसार राज्यपाल स्वतःच पदमुक्त होण्यासाठी इच्छुक असल्याचे सांगितले जात आहे. मागे एक जाहीर कार्यक्रम मध्ये त्यांनी आपल्या स्वतःच्या राज्यात जाऊन राजकारणात सक्रिय होण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र या सर्व घडामोडी मध्ये राजभवनातून या संदर्भातील सर्व व्रत फेटाळण्यात आले आहेत.