मोफत अन्न धान्य योजनेला केंद्र सरकारची ६ महिन्यांसाठी मुदत वाढ! ८० कोटी लोकांना लाभ मिळणार.

दिल्ली ( बातमी.in टीम )
: कोरोना काळात सर्वसामान्य गरीब लोकांसाठी केंद्र सरकारने सुरु केलेली मोफत अन्न धान्य योजनेला आता आणखीन पुढील सहा महिने मुदत वाढ देण्याचा निर्णय काल ( शनिवारी ) केंद्रीय मंत्री मंडळाच्या झालेल्या बैठकीत घेतला आहे . यामुळे आता ही योजना सप्टेंबर २०२२ पर्यंत चालणार आहे. यामुळे सर्वसामान्य गरीब लोकांना दिलासा मिळाला आहे.

दरम्यान केंद्र सरकारने २० मार्च २०२० पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजना लागू केली होती. आता मोफत अन्न धान्य योजनेचा कालावधी वाढवला असल्याने, देशातील तब्बल ८० कोटी लोकांना याचा थेट लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे केंद्र सरकारवर ८० हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार आहे.

Spread the love

Leave a Comment