मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट, राज्यात नवीन समीकरणाची चर्चा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची आज भेट घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आता शिंदेगट आणि वंचितच्या युतीची नव्याने चर्चा जोरात सुरु झाली आहे. प्रकाश आंबेडकर व उद्धव ठाकरे हे 20 नोव्हेंबर च्या एका कार्यकामात एकत्र येणार असून त्या अगोदरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन राजकीय डाव टाकल्याचे बोलले जात आहे.

आज दुपारी दीड वाजायच्या सुमारास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजगृहावर दाखल झाले. यावेळी त्यांच्या सोबत शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर व भावना गवळीही उपस्थित होत्या. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे देशाचं भूषन आहेत आणि त्यांचं वास्तव्य असलेली ही वास्तू त्यांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. यासाठी आम्ही आलो आहोत. बाकी कोणतीही राजकीय कारण सदर भेटी माघे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

त्यावेळच्या बाबासाहेब आंबेडकर यांच्या वापरातल्या वस्तू, त्यावेळीची त्यांची वाचनाची खोली, अभ्यासाचा टेबल, खुर्ची त्यांची पुस्तके त्यांच्या वापरातल्या वस्तू हा आपला ऐतिहासिक ठेवा असून ही इमारत बाबासाहेबांच्या संकल्पनेतून उभी राहीली आहे, हा सर्व ठेवा आज मुख्यमंत्री म्हणून पाहायला मिळाला असे ही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

Spread the love

Leave a Comment