सोलापूर जिल्ह्यातील शिवसेनेचा बडा नेता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या भेटीला! बंडाळी वाढण्याचे संकेत.

सोलापूर ( बातमी.in टीम )
: शिवसेनेच्या आमदारा पाठोपाठ नगरसेवक, पदाधिकारी सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाशी जाऊन मिळत आहेत. एकीकडे सर्व सामान्य शिवसैनिक व पदाधिकारी हे आपल्याच सोबत असल्याचा दावा उद्धव ठाकरे करीत असतानाच तालुका, तालुक्यातून पदाधिकारी व नेते मंडळी शिंदे गटात सामील होताना व पाठिबा देतांना दिसत आहेत. अशातच शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे हे आपल्या कार्यकर्तेसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सत्कार करण्यासाठी पोहचले व त्यांनी आपण तुमच्या सोबत असल्याचे सांगितले. यामुळे पदाधिकारीसुद्धा हळू हळू शिंदे गट जॉईन करताना दिसत आहेत.

 

शिवसेना वाढवण्यासाठी येत्या काळात आपण सोलापूर जिल्ह्यातील शिवसैनिकाला ताकत देवू, असे अश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी उपस्थित शिवसैनिकांना दिले. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे तालुका समन्वयक दीपक पाटणे, ज्येष्ठ पत्रकार नासिर कबीर, माजी शहरप्रमुख संजय शीलवंत, राजेंद्र मिरगळ, उद्योगपती श्रीकांत पवार यांनी शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानी भेट घेऊन त्यांचा सत्कार केला.

 

लवकरच आपण सोलापूर जिल्हा दौरा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय सोलापुरातील प्रश्नासाठी मंत्रालयात स्वतंत्र बैठक लावू, असे आश्वासन दिले. सोलापूर जिल्ह्यातील कोणताही शिवसैनिक माझ्याकडे काम घेऊन आला तर त्याला मोकळ्या हाताने परत पाठवणार नाही, असा विश्वास देऊन येणाऱ्या काळात शिवसैनिकाला ताकद देणे त्याला मजबूत करणे व त्या माध्यमातून संघटना मजबूत करणे याकडे लक्ष देणार असल्याचे मुख्यमंत्री यांनी सांगितले. म्हणजे आता येत्या काळा शिवसेना मजबूत करण्यासाठी आजी व माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र भर दौरे करताना महाराष्ट्राला पाहायला मिळणार आहेत.

 

Spread the love

Leave a Comment