मुख्यमंत्री नेत्यांचे पक्ष प्रवेश करुन घेण्यात व्यस्त; संभाजीराजे छत्रपतींना भेटणं टाळलं!

मुंबई: मराठा समाजाच्या प्रश्नांच्या पाठपुराव्यासाठी आज मंत्रालयात आलेल्या छत्रपती संभाजीराजे यांना मुख्यमंत्री शिंदे यांनी भेटण्याचे टाळल्याचा प्रकार मंत्रालयात घडला. मराठा समाजाच्या प्रश्नांच्या संदर्भात आज मंत्रालयात एक मिटिंग आयोजित केली होती. त्या मिटिंग नंतर छत्रपती संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्यासाठी गेले. मात्र तब्बल दीड ते दोन तास छत्रपती संभाजीराजे यांची भेट टाळली. यामुळे नाराज होऊन संभाजीराजे मंत्रालयातून निघून गेले.

दरम्यान मुख्यमंत्री यांना पक्ष नेत्यांचे प्रवेश करून घेण्यासाठी वेळ आहे, मात्र ते मराठा समाजाचे प्रश्न घेऊन आलेल्या छत्रपती संभाजीराजेंना (Sambhaji Raje Chhatrapati) भेटण्यास वेळ देत नाही असा अरोपच आज स्वराज्य संघटनेचे प्रवक्ता धनंजय जाधव यांनी केला आहे. यामुळे संभाजीराजे झाले असल्याचे ही त्यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.
यावेळी छत्रपती संभाजीराजे यांच्यासह मराठा समाजाचे समन्वयक व समाजाचे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.

या प्रकारानंतर मंत्रालयात संभाजीराजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर नाराज होऊन तडकाफडकी निघून गेले’ या चर्चेला उधाण आले होते. सदर प्रकरणी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यलयाकडून आता पर्यंत कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. शिंदे यांनी बंड केल्या नंतर संभाजीराजे यांनी मोठ्या प्रमाणात समर्थ करत शिंदे यांचीच पाठराखण केली होती. मात्र आजच्या प्रकरणे ते नक्कीच दुखावले असल्याचे बोलले जात आहे.

Spread the love

Leave a Comment