पुणे ( बातमी.in टीम ) : संभाजी भिडे हे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने नवीन वादाला तोंड फोडत असतात. कालही त्यांनी असचं एक वक्तव्य करुंन नव्याने वाद निर्माण केला आहे. हे विधान इस्लाम धर्माबद्दल आणि मुस्लिमांबद्दल आहे.  इस्लाम हा देशाचा शत्रू, असल्याचं आक्षेपार्ह वक्तव्य  संभाजी भिडेंनी केलंय. यावेळी त्यांनी सुशिक्षित लोकांना टार्गेट करीत जुन्या गोष्टी विसरून पुढे जाण्याची  वृत्ती देशातल्या सुशिक्षितांमध्ये असल्याचंही ते म्हणाले.

संभाजी महाराजांना श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत प्रखर राष्ट्राभिमान उत्पन्न करणारी गोष्ट आहे. ती आपण करुया आणि एक दिवस असा उजाडावा की झालेल्या बलिदानाचा सूड घेणारा हिंदुस्तान उभा रहावा ही अंतकरणामध्ये भावना धरुन आपण वाटचाल करत राहूया असं आवाहनही भिडेंनी केलंय. भिडे यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यवर आता अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.