प्रतिनिधी ( औरंगाबाद ) : राज ठाकरे यांच्या आज होणाऱ्या सभेच्या पार्श्वभूमीवर वंचितचे नेते अमित भुईगळ यांना पोलिसांकडून अटक केली आहे. वंचितने राज ठाकरेच्या औरंगाबाद येथील 1 मेच्या सभेला विरोध करीत सभा होऊ नये म्हणून पोलीस प्रशासनाला निवेदन दिले होते. मात्र पोलिसांकडून 16 अटीवर सभेला परवानगी दिली. त्यानंतर वंचितच्या वतीने राज्य भारत 1 मेला शांती मार्च काढण्याचे जाहीर केले होते. तसे आयोजन वंचित कडून करण्यात आले होते, मात्र त्या अगोदरच पोलीसानी वंचितच्या कार्यकर्ते यांची धरपकडं चालू केली.
यामध्ये औरंगाबाद वंचित बहुजन आघाडीचे नेते सिध्दार्थ मोकळे, अमित भुईगळ, जिल्हाध्यक्ष योगेश बन, प्रभाकर बकले, शहराध्यक्ष जलीस अहमद, संदिप सिरसाठ, डॉ जमील देखमुख, युवा शहराध्यक्ष अफसर खान पठाण सहीत शेकडो कार्यकर्ते, नेते पदाधिका-यांना पोलीसांनी सकाळपासुन घरातुन अटक करुन विविध पोलीस स्टेशन मध्ये ठेवले आहे.
दरम्यान वंचितचे नेते अमित भुईगळ यांना स्वतःच्या अटके च्या पार्श्वभूमीवर गृहमंत्री वळसे पाटील यांचा निषेध करीत, पोलीस हे हुकूमशाही करीत असल्याचे मत व्यक्त केले. 3 मे नंतर कोणत्या परिस्थितीत मशिदी वरून भोंगे उतरू देणार नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत त्यांनी थेट राज ठाकरे यांना भोंगे उतरवून दाखवयाचे चॅलेंज केले आहे.