राज्य शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी, सरकार कडून अनोखी भेट

Ekanath Shinde

राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे. राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय , निमशासकीय ,जिल्हा परिषदा त्याचबरोबर इतर पात्र कर्मचाऱ्यांना राज्य शासनाकडून दिवाळी सणाची अनोखी भेट देण्यात आली आहे. यामुळे आता राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी साजरा होणार आहे .(CM Eknath Shinde state employees payment before Diwali)

राज्य शासनाकडुन यंदा राज्य कर्मचाऱ्यांचे माहे ऑक्टोंबर महिन्याचे वेतन लवकरच होणार असल्याचे जाहीर कारण्यात आले आहे. त्यामुळे दिवाळी सणाच्या अगोदर म्हणजेच दि. 24 ऑक्टोंबरपुर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबरला वेतन देण्याची मान्यता शासनाकडून देण्यात आली आहे. 22 तारखेपासून दिवाळीस सुरू होणार आहे. तत्पूर्वीच 21 तारखेलाच सर्व कर्मचाऱ्यांचा पगार होणार आहे, त्यामुळे यंदाची दिवाळी राज्य कर्मचाऱ्यांसाठी आणखीनच आनंदाची होणार आहे.

Spread the love

Leave a Comment