विजय साळगावकर परत येतोय! ‘दृश्यम २’ चा धमाकेदार टीझर लॉन्च.

2 और 3 ऑक्टोबर को क्या हुआ था याद है ना ? दृश्यम चित्रपटातील अजय देवगनचा हा डायलॉग अनेकांन आठवत असेल. त्याने सकारालेला विजय साळगावकर अनेकांना भावला होता. तोच विजय साळगावकर आता परत येतोय त्याच्या फॅमिली सोबत. अनेकजण ‘दृश्यम २’ या चित्रपटाची वाट पाहत होते. आता त्यांची प्रतीक्षा समाप्त होणार आहे. आपल्या फॅमिलीसाठी सर्वकाही करणारा विजय साळगावकर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. ‘दृश्यम २’ हा सिनेमा नोव्हेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. नुकताच ‘दृश्यम २’चा टीझर नुकताच लॉन्च करण्यात आलाय. सदर १ मिनिट २२ सेकंदाच्या टीझर प्रेक्षकांची धडधड वाढवणारा आहे.

 

निशिकांत कामत दिग्दर्शीत दृश्यम हा सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडला होता. सस्पेन्स ,थ्रिल असणाऱ्या या चित्रपटातील अजय देवगणचे ‘विजय साळगावकर’ हे पात्र प्रेक्षकांना खूपच भावले होते. साऊथच्या चित्रपटाचा रिमेक असणारा हा चित्रपट हिंदीत ही कमालीचे यश मिळवून गेला. साऊथ मध्ये मोहनलाल यांनी यात प्रमुख भूमिका साकारली होती. हिंदीत ही भूमिका अजय देवगन याने यशस्वीपणे निभावली आहे.

दृश्यम २’चा टीझर लॉन्च झाल्या नंतर प्रेक्षकांची आणखीनच चित्रपटा विषयक उत्सकता वाढली आहे. ‘दृश्यम २’ मध्ये नवीन कलाकारांच्या भूमिका पाहायला मिळणार आहेत. चित्रपटात अजय देवगणबरोबर अक्षय खन्ना, तब्बू, श्रीया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्त यांच्या ही प्रमुख भूमिका आहेत. ‘दृश्यम २’ सिनेमाचं दिग्दर्शन अभिषेक पाठकनं केलं आहे. दृश्यम या पहिला भागा प्रमाणे ‘दृश्यम २’ हाही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला आहे.

Spread the love

Leave a Comment