मोठी बातमी : एकनाथ शिंदेच्या नवीन गटाचे नाव ‘ शिवसेना बाळासाहेब ‘! पत्रकार परिषदे होणार घोषणा.

मुंबई
:शिवसेनेतून बाहेर पडलेल्या एकनाथ शिंदे यांनी बंडखोर आमदारांचा वेगळा गट स्थापन करण्याचे ठरले असून, या गटाचे आपले नाव ही ठरवल आहे. ‘शिवसेना बाळासाहेब ‘ असे गटाचं नाव असणार असून, थोड्याच वेळात पत्रकार परिषद घेऊन अधिकृत घोषणा होणार असल्याची माहिती सूत्रांनी सांगितले आहे.

दरम्यान या गटाचे प्रवक्ते ठवण्याचे काम सुरु असून, प्रवक्ते निश्चित झालेकी पत्रकार परिषद घेऊन सदर गटाची घोषणा केली जानार आहे. सध्या या बंडा विरुद्ध महाराष्ट्रात मोठया प्रमाणात शिवसैनिक आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहेत. तसेच
बाळासाहेब ठाकरे यांचे नाव वापरल्यास शिवसेना कोर्टात जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर महाराष्ट्रातल्या ​सत्तासंग्रामाला शनिवारीही हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळाले असून संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पुण्यात तानाजी सावंत यांच्या ऑफिसची आज तोडफोड केली. तर काल कुर्ल्याचे शिवसेना आमदार मंगेश कुडाळकरांच्या कार्यालयावर काही लोकांनी हल्ला केला.त्यांनी गेटची तोडफोड केली. अहमदनगरमध्ये बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या फोटोला काळे फासण्यात आले.

Spread the love

Leave a Comment