नव मतदार नावनोंदणी बाबत निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, वयाच्या अटी बाबत घेतला हा निर्णय.

बातमी.in टीम –

निवडणूक आयोगाने देशातील नव मतदार नावनोंदणी बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. या नुसार तरुणांच्या वयाच्या अटी बाबत महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मतदार नोंदणीसाठी आता वयाची अट ही 18 वर्ष असणार नाही. आता 17 वर्षे पूर्ण झालेले असले, तरी मतदार यादीत आगावू अर्ज करता येणार आहे. याबाबत निवडणूक आयोगाने तशी परवानगी दिली असून, सर्व राज्यातील निवडणूक आयाेगांना निर्देश दिले आहेत.

दरम्यान सदर निर्णया संदर्भात देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार व निवडणूक आयुक्त अनुप चंद्र पांडे यांनी मतदार नोंदणीतील तांत्रिक बाबी दूर करण्याचे आदेश दिले असल्याचे समजते. यानुसार तरुणांना मतदार यादी नाव नोंदविण्यासाठी आता 1 जानेवारी पर्यंत वाट पाहावी लागणार नाही. तर 17 वर्ष पूर्ण झाले असतील तर आगावू अर्ज करून नाव नोंदणी करता येणार आहे. मात्र वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यावरच मतदान करता येणार आहे.

तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाणार….

निवडणूक आयोगाने आता तीन टप्प्यात मतदार नोंदणी करता येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. म्हणजे या पूर्वी 1 जानेवारीला 18 वर्षे पूर्ण झालेल्या तरुणांनाच मतदार यादीत नाव नोंदवण्यासाठी अर्ज करता येत होता. मात्र, आता नव्या मतदारांना 1 एप्रिल, 1 जुलै आणि 1 ऑक्टोबर, अशा तीन टप्प्यात मतदार यादीत नाव नोंदवता येणार आहे. त्यासाठी प्रत्येक तिमाहीला मतदार यादी अपडेट केली जाईल.

Spread the love

Leave a Comment