ब्रेकिंग बातमी : राष्ट्रपती पदासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर, यांच्या नावाची जोरदार चर्चा.

दिल्ली : निवडणूक आयोगाने (Election Commission of India) आज (ता. 9) राष्ट्रपती पदासाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला असून लवकरच देशाला नवे राष्ट्रपती (President of India) मिळणार आहेत. येत्या 21 जुलैपर्यंत नव्या राष्ट्रपतींची निवड होणार आहे. त्यासाठी निवडणूक वेळापत्रक जाहीर झाले आहे.दरम्यान सध्याचे भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ येत्या 24 जुलै 2022 रोजी संपत आहे. त्याआधी देशाच्या 15 व्या राष्ट्रपतींची निवड केली जाणार असून त्यासाठी 18 जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे.

निवडणूक कार्यक्रम ( Election program )

    • दि. 15 जून – निवडणूक अधिसूचना जारी होणार
    • दि. 29 जून – उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख
    • दि. 2 जुलै – अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख
  • दि. 18 जुलै – मतदान
  • दि. 21 जुलै – निकाल
  • दि. 24 जुलै – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा कार्यकाळ

दरम्यान निवडणूक आयोग (Election Commission ) मतदानासाठी मतदारांना पेन देणारअसून 4809 मतदार मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. यामध्ये 776 खासदार, 4033 आमदार मतदान प्रक्रियेत भाग घेतील.

राष्ट्रपती पदासाठी चर्चेतील नावे पुढीलप्रमाणे –

दरम्यान राष्ट्रपती पदासाठी प्रामुख्याने ‘या’ नावांची चर्चा जोरदार सुरु आहे. यामध्ये माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन, उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, छत्तीसगडच्या, राज्यपाल अनसूया उईके, तेलंगणाच्या राज्यपाल तमिलसाई सुंदरराजन, झारखंडच्या राज्यपाल द्रोपदी मुर्मू यांच्या नावाची सध्या चर्चा चालू आहे.

Spread the love

Leave a Comment