शेतकऱ्यांनो लम्पी आजाराने गाय म्हैस बैल वासरे मृत पावल्यास, शासनाकडून मिळणार 71,000 रू. ची मदत! शासन जीआर पहा.

राज्यात साध्य जनावरांच्या लम्पी आजाराने थैमान मांडले आहे. त्यामुळे शेतकरी अधिक चिंतेत पडला आहे. अनेक जनावरे या आजाराने मृत होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणात होत आहे. त्या मुळे शासन स्तरावरून मदत व्हावी ही मागणी जोर धरतं होती. या पार्शवभूमीवर शासने लम्पी आजाराने जनावरे मृत झाल्यास 71,000 रू. ची मदत देण्याचे घोषित केले आहे. या संदर्भातील जीआर शासनाकडून काढण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

अर्थसहाय्य मिळण्याचे निकष जाणून घ्या….

केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण धोरणामधील निकषानुसार अर्थसहाय्य मिळणार आहे. यामध्ये राज्यातील गोवंशीय पशुधनामध्ये उद्भवलेल्या विषाणूजन्य लम्पी चर्म रोग प्रादुर्भावामुळे शेतकरी / पशुपालक यांच्या मृत पावलेल्या पशुधनास विशेष आर्थिक मदत मिळणार आहे.

लम्पी चर्मरोग प्रादुर्भावामुळे ज्या शेतकरी / पशुपालकांच्या पशुधनाचा मृत्यू झालेला आहे अशा शेतकरी / पशुपालकांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय आपत्ती निवारण निधी धोरणामधील निकषाप्रमाणे १०० टक्के राज्य शासनाचे अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी आवश्यक कार्यवाहीचे आदेश जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांना मिळाले आहेत.

सद्य:स्थितीत या रोगाचा प्रादुर्भाव राज्यातील 21 जिल्ह्यांमध्ये झपाट्याने पसरलेला आहे. राज्यातील उद्भवलेला लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव व त्यावर नियंत्रण आणण्यासाठी कार्यवाही सुरु आहे.

शासन निर्णय
ज्या शेतकरी / पशुपालक यांच्याकडील पशुधन लम्पी चर्मरोगामुळे मृत्यूमुखी पडले आहे, अशा शेतकरी / पशुपालकांनी याबाबतची सूचना तात्काळ किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या दिवशी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात / संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक तसेच ग्रामपंचायतीस द्यावयाची आहे. संबंधित शेतकरी / पशुपालक यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यावरील पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक, ग्रामसेवक / तलाठी, पोलीस पाटील तसेच दोन स्थानिक नागरीक यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत पशुधन मृत्यूमुखी पडल्याबाबतचा पंचनामा करून घ्यावयाचा आहे. सदर पंचनाम्यात पशुधनाचा मृत्यू लम्पी चर्मरोगामुळे झाला असल्याबाबतचा स्पष्ट उल्लेख असणे आवश्यक आहे.

सदरचा पंचनामा संबंधित पशुधन विकास अधिकारी / सहायक पशुधन विकास अधिकारी / पशुधन पर्यवेक्षक यांनी सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे किंवा तालुकास्तरावर ही संस्था नसल्यास लगतच्या तालुक्याच्या सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, तालुका लघुपशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय यांचेकडे तात्काळ शक्यतो त्याच दिवशी सादर करावा.

शासन निर्णय (GR) डाऊनलोड कराक्लिक करा.

Spread the love

Leave a Comment