अखेर निवडणूक आयोगाकडून ठाकरे गट आणि शिंदे गटाला नवीन पक्ष चिन्ह आणि नाव जाहीर.

शिवसेनेचे निवडणूक चिन्ह

मुंबई : शिवसेनेचे निवडणूक चिन्ह निवडणूक आयोगाने गोठवलं आणि शिवसेना हे नाव वापरण्यास मनाई केल्यानंतर दोन्ही गटाला नवीन पक्ष चिन्ह व नाव दिली आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाकडून ‘ मशाल ‘ हे चिन्ह देण्यात आलं आहे . तर ‘ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ‘ असे नाव देण्यात आले आहे . यासोबतच एकनाथ शिंदे गटाला ‘ बाळासाहेबांची शिवसेना ‘ असे नाव देण्यात आले आहे . मात्र शिंदे गटाला अद्याप कोणतेही चिन्ह दिलेले नाही . आयोगाकडून नवीन तीन चिन्हे सूचवन्याचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेला पर्यायी नावं आणि चिन्ह निवडणूक आयोगा कडे मागितले होते, त्यापैकी त्रिशुळ , उगवता सूर्य आणि धगधगती मशाल ही चिन्हे व नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे , शिवसेना बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही पर्यायी नावं दिली होती . तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या नावांमध्ये शिवसेना बाळासाहेब ठाकरे , बाळासाहेबांची शिवसेना आणि शिवसेना बाळासाहेबांची असे तीन पर्याय देण्यात आले होते.

Spread the love

Leave a Comment