महात्मा गांधी यांनी अखेरचा श्वास घेताना ‘हे राम’ म्हटलं नाही, सदावर्ते यांचा दावा!
महात्मा गांधी यांनी अखेरचा श्वास घेताना ‘हे राम’ म्हटलं असं सांगण्यात येतं. पण ज्यावेळी नथुरामजी गोडसे यांची कोर्टात ट्रायल झाली त्यावेळी नथुरामजी गोडसे यांनी गांधीजींनी ‘हे राम’ म्हटलं नव्हतं असं सांगितलं, ही वस्तूस्थिती कायम लपवण्यात आल्याचं सदावर्ते यांनी दावा करीत नथुराम गोडसे याचा उल्लेख ” नथुरामजी गोडसे ” असा करीत एक नवा वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
दरम्यान एसटी कामगार यांना सोबत घेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी आज ‘एसटी कष्टकरी जनसंघ’ या संघटनेची स्थापना केली. नव्या संघटनेची घोषणा करतं असताना संघटनेचे कार्यकर्ते हे ते प्रचारक म्हणून काम करतील व आगामी निवडणुकात सक्रियरित्या ते प्रत्येक वॉर्ड मध्ये जाऊन प्रचार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.