
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत गौतम अदानी यांचे स्थान दिवसेंदिवस वरती जाताना दिसत आहे. हिरे व्यापारी म्हणून उद्योगाला सुरुवात करणारे अदानी यांनी आज जगातील तिसरे सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून स्थान मिळवले आहे. पहिल्यांदाच एखादी आशियाई व्यक्ती ब्लूमबर्ग अब्जाधीशांच्या यादीत इतक्या वरच्या स्थानावर पोहचली आहे. यापूर्वी जॅक मा ( अलिबाबा ) आणि मुकेश अंबानी ( रिलायन्स ) हेच या यादीतले आशियाई होते. अमेरिकेतील अनेक श्रीमंतांनी वैयक्तिक संपत्ती दान केली , त्यामुळे त्यांच्या मानांकनात घसरण झाली आहे.
कोण आहेत गौतम अदानी ?
हिरे व्यापारी म्हणून व्यवसायास सुरुवात करणारे गौतम अदानी हे गुजरात राज्यातील रहिवाशी आहेत. आज त्यांनी विविध क्षेत्रात आपल्या उद्योग – व्यवसायाचा जम बसवीला असून ते अक्षय्य ऊर्जा ,बंदर – विमानतळ, कोळसा उत्खनन, सिमेंट उद्योग , मीडिया या सारख्या महत्वपूर्ण क्षेत्रात यशस्वी वाटचाल केली आहे.
गौतम अदानी यांची एकूण संपत्ती किती?
गौतम अदानी यांचे 60 वर्ष असून त्यांची एकूण संपत्ती सध्या $ 137.4 अब्ज आहे . यावर्षी त्यांची एकूण संपत्ती $ 60.9 अब्जने वाढली आहे . जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या ( Gautam Adani ) यादीत स्थान मिळविणारे ते पहिले आशियाई भारतीय आहेत . अदानी हे आतापर्यंत आशियातील आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते . आता त्यांनी जगातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वात श्रीमंत व्यक्ती होण्याचा मान मिळवला आहे
सन 2020 पासून अदानी ग्रुपचे शेअर्स जवळजवळ 1000 टक्क्यांनी वधारले आणि त्यांच्या प्रगतीस आणखीन गती मिळण्यास साह्य झाले. गौतम अदानी नेहमी विविध कारणांनी वादात का असतात. विशेष म्हणजे त्यांचे हे पंतप्रधान मोदीं यांच्या सोबतचे संबंध अतिशय जवळचे आहेत. ते पंतप्रधान यांच्या अत्यंत जवळचे असल्याचं सातत्याने बोललं जातं .