होळीच्या शुभ मुहूर्तावर सोने-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे भाव!

मुबंई ( प्रतिनिधी )
: होळीच्या पार्श्वभूमीवर सोने-चांदी स्वस्त झाले आहेत. आठवडाभरात सोने दरात घसरण दिसत आहे. सोने खरेदी करण्यासाठी ही चांगली संधी आहे. आज एकंदरीत काल 16 मार्चच्या तुलनेत घसरण झाली आहे. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी तेजी दिसली आहे. पुढील आणखीन काही काळ भाव कमी राहतील असे जाणकार म्हणतात.

गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर

▪️ पुणे – 47,350 रुपये

▪️ नागपूर – 47,380 रुपये

▪️ मुंबई – 47,300 रुपये

▪️ सुरत – 47,360 रुपये

▪️ हैदराबाद – 47,300 रुपये

▪️ दिल्ली – 47,300 रुपये

▪️ बँगलोर – 47,300 रुपये

▪️ चेन्नई – 47,920 रुपये

▪️ कोलकत्ता – 47,300 रुपये

मुंबईमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 52,280 रुपये.पुण्यात प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,650 रुपये.नागपूरमध्ये प्रति 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचा दर 51,680 रुपये.चांदीचा आजचा प्रती 10 ग्रॅमचा दर 679 रुपये.

सोन्याचा वापर प्रामुख्याने दागिने उद्योगाच्या गरजा भागविण्यासाठी केला जातो. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या 11 महिन्यांत (एप्रिल-फेब्रुवारी) देशातील सोने आयात 73 टक्क्यांनी वाढून 45.1 अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, फेब्रुवारी 2022 मध्ये या सोन्याची आयात मात्र 11.45 टक्क्यांनी घटून 4.7 अब्ज डॉलरवर आली आहे.

Spread the love

Leave a Comment