ग्रामपंचायत निवडणूक : शासनाच्या ग्रामविकास विभागाचा मोठा निर्णय..! आता सरपंच किंवा सदस्य होण्यासाठी ‘एवढं’ शिक्षण लागणार.

राज्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहू लागले असून, गावातल्या कट्ट्या कट्ट्यावरती ग्रामपंचायत निवडणूक च्या संदर्भात चर्चा रंगू लागल्या आहेत. राज्याच्या ग्रामविकास खात्याकडून ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे. यानुसार ग्रामपंचायत सदस्य किंवा सरपंच होण्यासाठी उमेदवार किमान सातवी पास असावा, असा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

राज्यात सध्या सुमारे 7751 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरु असून, सध्या उमेदवारी अर्ज भरण्याची रणधुमाळी चालली आहे. त्यामुळे ऐन थंडीत गावचे राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच निवड थेट जनतेतून होणार असल्याने चुरस आणखी वाढली आहे.

सदस्य किंवा सरपंच शैक्षणिक अर्हतेबाबत अध्यादेश…

राज्याच्या ग्रामविकास विभागाने सरपंच अथवा सदस्यांचा शैक्षणिक अर्हतेबाबत आदेश जारी केला आहे. त्यानुसार, 1 जानेवारी 1995 नंतर जन्मलेली व्यक्तीस सरपंच अथवा सदस्य होण्यासाठी किमान सातवी पास असणे आवश्यक आहे.

लागणारी कागदपत्रे / प्रमाणपत्र

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना, सातवी पास असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने प्रमाणित केलेले प्रमाणपत्र इच्छूक उमेदवारांना सादर करावे लागणार आहे. अर्थात, ज्यांचा जन्म 1995 पूर्वी झालेला असेल, त्यांना मात्र ही शैक्षणिक अट लागू नसेल.

Spread the love

Leave a Comment