ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार, राज्य निवडणुक आयोगाकडून प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्याबाबत मोठी अपडेट.

राज्यात आता लवकरच ग्रामपंचायत निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. राज्यातील ऑक्टोबर ते डिसेंबर २०२२ या कालावधीत मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापित सुमारे ७ हजार ६४९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या १३ ऑक्टोबर २०२२ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. या संदर्भात अधिकृत सूचना राज्य निवडणूक आयोगाकडून जाहीर कारण्यात आली आहे.

प्रभागनिहाय प्रारूप मतदार याद्या जाहीर झाल्या नंतर त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील, विधानसभा मतदारसंघाच्या ३१ मे रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या या निवडणुकांसाठी ग्राह्य धरण्यात येणार आहेत.असं राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलं आहे.

त्या प्रभागनिहाय विभाजित केल्यानंतर १३ ऑक्टोबर रोजी प्रारूपाच्या स्वरूपात प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर १८ ऑक्टोबरपर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या २१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील. असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिसूचनेत नमूद कारण्यात आले आहे.

Spread the love

Leave a Comment