चैत्यभूमी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त पालकमंत्री दीपक केसरकर यांच्याकडून अभिवादन

मुंबई : ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मुंबई शहरचे पालकमंत्री तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमीला भेट दिली. यावेळी डॅा. बाबासाहेब आंबेडकर स्मारकास अभिवादन केले.पालकमंत्री श्री.केसरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करून तसेच बुद्धवंदना म्हणून अभिवादन केले. यावेळी त्यांच्या हस्ते भिक्कू संघाला फळदान करण्यात आले.

दरम्यान यावेळी श्री. केसरकर यांनी चैत्यभूमीच्या सोयी सुविधाचा आढावा घेतला. श्री. केसरकर म्हणाले की, धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त राज्यभरातील अनुयायी नागपूर येथील दीक्षाभूमी येथे जात असतात. काही अनुयायी अभिवादनासाठी मुंबईतील चैत्यभूमी येथे येतात. दीक्षाभूमी, चैत्यभूमी हे अनुयायींचे श्रद्धास्थान आहे. या श्रद्धास्थानाच्या ठिकाणी अनुयायींना आवश्यक सर्व सोयी सुविधा देणे गरजेचे आहे. अनुयायींना सोयी-सुविधा देण्यासंदर्भात पूर्व तयारी करण्याची गरज असते. त्यासाठी विविध संघटनांशी चर्चा करुन पालकमंत्री या नात्याने कार्यक्रमांची पूर्व तयारी करण्याचा निर्णय घेतला आहे.

यावेळी पुज्य भदंत डॉ.राहुल बोधी महाथेरो, डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वयक समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, व्यवस्थापक प्रदिप कांबळे आदी उपस्थित होते.

Spread the love

Leave a Comment