
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नोव्हेंबर महिन्याच्या शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात नुकताच एक शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. सदर शासन निर्णया नुसार 2022-2023 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभागासाठी अर्थसंकल्पित निधी झाला आहे. हा निधी राज्यातील कर्मचाऱ्यांचे वेतन / थकबाकी अदा करण्यासाठी बीम्स प्रणालीवर उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. ( State Employee News )
दरम्यान सदर निधींचे लेखाशिर्षनिहाय वाटप करणेबाबतचा शालेय शिक्षण व क्रिडा विभागांकडुन एक महत्त्वाचा शासन निर्णय देखील निर्गमित झाला आहे. महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2022 अंतर्गत 2022-2023 चे अनुदान वितरण करणेबाबत सदर जीआर आहे.
दरम्यान वित्त विभागाने शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजुर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयाच्या अधीन राहून तसेच यामधील अटी व शर्तीचे पालन करून तसेच मुंबई वित्तीय नियम मधील तरतुदींचे पालन करण्याच्या सूचना या शासन निर्णयात देण्यात आल्या आहेत.
शासन निर्णय खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता
शासन निर्णय