india beat New Zealand T-20 : सुर्यकुमारचे वादळी शतक, टीम इंडियाचा न्यूझीलंडवर दणदणीत विजय..

Suryakumar
Suryakumar

india beat New Zealand T-20 : भारत आणि न्यूझीलंडमधील (INDvsNZ) दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये भारताने 65 धावांनी दणदणीत विजय मिळवला. भारताकडून खेळताना सुर्यकुमार याने वादळी शतक ठोकत न्यूझीलंड समोर एक अहवान उभा केले. यामध्ये भारताने निर्धारित 20 षटकात विजयासाठी न्यूझीलंड समोर 192 धावांचं आव्हान ठेवलं होतं. मात्र भारताच्या भेदक गोलंदाजी पुढे न्यूझीलंडचा संघ लवकरच गारद झाला. न्यूझीलंडचा खेळ 126 धावांवर आटोपला. भारताकडून दीपक हुड्डाने सर्वाधिक सर्वाधिक 3 विकेट्स घेत भारताच्या विजयात मोठे योगदान दिले. (india beat new zealand second t20 match latest marathi sport news)

दरम्यान टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय न्यूझीलंडने घेतला होता. जो त्यांना खूपच महागात पडला. भारताकडून सलामीस उतरलेल्या इशान किशन आणि ऋषभ पंत पैकी पंत जास्त वेळ मैदानावर टिकला नाही. 6 धावांवर स्वस्तात परतला. मात्र वन डाऊन ला आलेल्या सुर्यकुमार यादवने आणि किशनने मोठी भागीदारी केली. यामध्ये इशान किशन 36 धावा केल्या.

न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदी वैशिष्ट्येपूर्ण गोलंदाजी ...

दरम्यान न्यूझीलंडचा गोलंदाज टिम साऊदीची वैशिष्ट्येपूर्ण गोलंदाजी पाहावयास मिळाली. यामध्ये त्याने हॅट्रिक घेत खेळात रंगत आणली. तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या चेंडूवर हार्दिक पंड्या 13, दीपक हुड्डा आणि वॉशिंग्टन सुंदरला भोपळाही फोडू न देता तंबूत पाठवलं. सूर्याने एकट्याने एक बाजू लावून धरत न्यूझीलंडच्या गोलंदाजांची धुलाई चालू ठेवली होती. 20 षटकांमध्ये भारताने 192 धावांचं आव्हान दिलं होतं. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेमध्ये 1-0 ने आघाडी घेतली आहे.

 

Spread the love

Leave a Comment