
मुबंई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वरओक निवासावर एसटी कामगागारांनी अचानक केलेल्या हल्लाबोल अंदोलन नंतर राज्यात खलबळ माजली असून. आता या आंदोलना माघे कोणाचे माईंड हे शोधण्यासाठी मुबंई पोलीस कसुसून चौकशी करीत आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ” खळबळजनक ” गौप्यास्फ़ोट केला. आंदोलकन कर्त्यास शरद पवार यांना इजा करायची होती. त्यांनी पवारांच्या सिल्वरओक निवासाची रेकी सुद्धा केली होती, अशी माहिती त्यांनी प्रसार माध्यमाशी बोलताना दिली आहे.
दरम्यान सदर प्रकरणात एस टी कर्मचाऱ्यांचे वकील सदावर्ते यांना न्यायालयाने दोन दिवसाची पोलीस कोठडी दिली असून, इतर आंदोलकाना 14 दिवसाची कोठाडी न्यायालयाने सुनावली आहे. या माघे आणखीन कोण कोण आहेत, याबाबत पोलीस चौकशी करीत आहेत. सदर प्रकरणावरून सत्ताधारी व विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोप यांच्या फैरी झाडत असून राणे कुटूंबातील नेते हे संजय राऊत यांचीच घडवून आणल्याची टीका केली आहे. तर या माघे भाजपाचे दोन मोठे नेते असल्याचे आरोप सेना – राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या कडून होताना दिसत आहेत. दरम्यान या प्रकरणात वकील सदावर्ते यांचा सिडिआर तपासाला जाण्याची शक्यता असून यातूनच खेरे सत्य समोर येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे.