
बातमी. in टीम
भाजप नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या पुत्र माजी खासदार निलेश राणे यांच्याशी वादग्रस्त विधानाने नेहमी प्रमाणे वाद पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. केसरकरांच्या एका विधानावर व्यक्त होताना निलेश राणे यांनी केसरकारांना ” मिळतेवढा सन्मान घेण्याचा, सल्ला देत तेवढी आपली लायकी नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. तुम्हाला राजकीय जीवदान मिळाले आहे तेवढ्यात समाधान माना असाही टोला त्यांनी केसरकरांना मारला आहे.
दरम्यान केसरकरांनी राणे यांना प्रतिउत्तर देतांना, कोकण वासियांनी राणे यांना माघेच त्यांची लायकी दाखवली आहे. असा टोला मारत पलटवार केला. आपण त्याना आपल्या पेक्षा वयाने लहान असल्याचे बोले होते, त्यांनी त्याचा अर्थ वेगळा काढत अशी टीका करणे योग्य नसल्याचे सांगितले. पुढील काळात ही त्यांना त्याची लायकी कोकणवासी दाखवतील असे केसरकर यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
दरम्यान राणे आणि केसरकर यांच्या या वाढमुळे भाजपा आणि शिंदे गट यांच्यात पुढील काळात असेच खटके उडणार हे नक्की आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळी वरील दोन्ही बाजूचे नेते यांनी वेळेत हस्तक्षेप नाही केला तर हा वाद वाढत जाणार हे नक्कीआहे.