ब्रेकिंग बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे ढकल्या जाणार, मुख्यमंत्री निवडणूक आयोगाला भेटणार.

मुबंई ( बातमी.in टीम ) – राज्य निवडणूक आयोगाने काल (ता. 8) नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा कार्यक्रमाची घोषणा केली. यामध्ये पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर जाहीर झाला. मात्र ओबीसी आरक्षणा शिवाय या निवडणुका होऊ नयेत यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच राज्य निवडणूक आयोगाची भेट घेणार आहेत.

 

दरम्यान मुख्यमंत्री व उप मुख्यमंत्री सद्या दिल्ली दौऱ्यावर असून, भाजपच्या सर्व बड्या नेत्यासह राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची त्यांनी भेट घेऊन विविध विषयावर चर्चा केली. या नंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना पत्रकारांनी विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देतांना, राज्य सध्या ओबीसी आरक्षणाचा मुद्दा गाजत असून, ओबीसी आरक्षणा शिवाय निवडणुका नकोत असे भाष्य त्यांनी यावेळी केले.

 

दरम्यान शिंदे गट व शिवसेना यांच्यात निवडणूक चिन्ह धनुष्य बाण यावरून वाद सुरु असून, हे चिन्ह आपल्यालाच मिळणार असा दावा दोघे करीत असले तरी, हे प्रकरण न्याय प्रविष्ठ आहे. निवडणूक आयोग हे चिन्ह कोणास देतो कि गोठवतो हेही पाहावे लागेल. चिन्ह गोठावले तर दोघांनाही नवीन निवडणूक चिन्ह घेऊन निवडणूक लढवाव्यात लागणार आहेत. म्हणून हा वाद मिटल्यानंतर किंवा चिन्ह मिळाल्यावर निवडणूक व्हाव्यात असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटत असावे. मात्र या बाबत निवडणूक आयोग काय भूमिका घेतो ह्या बाबत काही सांगता येणार नाही.

Spread the love

Leave a Comment