मोठी बातमी : पंतप्रधान मोदी-शरद पवार यांच्यात दिल्लीत भेट; राजकीय घडामोडीला वेग!

दिल्ली ( बातमी.in टीम )
: केंद्रीय तपास यंत्रणांकडून सध्या महाराष्ट्र राज्यातील माविका सरकार मधील नेत्यांवर जोरदार कारवाई होत आहे. याच पार्शवभूमीवर अचानक राष्ट्रवादी काँग्रसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. या दोन नेत्यामध्ये जवळपास २० ते २५ मिनिटे चर्चा झाल्याचे समोर आले आहे. (Sharad Pawar Meets Pm Modi In Delhi) राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाया होत असताना ह्या भेटीला अधिक महत्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान कार्यालयात हे दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याचे समजते.

दरम्यान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या भेटी दरम्यान काय चर्चा झाली याबाबत काहीही तपशील समजू शकला नसला तरी, या राष्ट्रवादी-शिवसेनेच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांचा होत असलेल्या कार्यवाहीमुळे सदर भेट झाल्याचे समजते.

शरद पवारांची दिल्लीत डिनर डिप्लोमासी!

शरद पवार यांच्या दिल्ली निवासस्थानी कालच महाराष्ट्रातून आलेल्या आमदारांसाठी स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सदर स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित होते. याची सुद्धा खूप चर्चा रंगली होती. हे दोन नेते काल एकत्र येणं व त्यानंतर आज थेट पंतप्रधान मोदी यांनी भेट होणे यामुळे राजकीय वर्तुळा चर्चेला खूप उधाण आले आहे.

Spread the love

Leave a Comment