मुबंई ( बातमी.in टीम )
: महा विकास आघाडीचे मंत्री नवाब मलिक ईडीच्या कस्टडीत असून त्यांच्या गैर व्यवहाराची चौकशी सुरु आहे. भाजपा कडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरत आहे. मात्र आता त्यांचा राजीनामा न घेता त्यांच्या खात्याचे खाते काढून ते सामाजिक मंत्री धनंजय मुंढे यांच्याकडे सोपावले जाण्याची शक्यता आहे. अशी माहिती सुत्रा कडून समजते आहे.

दरम्यान आजच या संदर्भात निर्णय होण्याची शक्यता आहे. विरोधक मात्र नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणीवर ठाम असून, महाविकास आघाडीच्या या निर्णय त्यांना कदापि मान्य होण्या सारखा नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या बाबत आपली भूमिका अदयापही स्पष्ट केली नसल्याने, फक्त खाते काढून तात्पुरती जबाबदारी धनंजय मुंढे यांच्या कडे द्यावे कि मालिक यांचा राजीनामा घ्यावा याबाबत त्यांनी आणखीन काही स्पष्ट सांगितले नाही. त्यामुळे आज होणाऱ्या घडामोडीत काय निर्णय होतो हे पाहावे लागेल.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.