महाराष्ट्र “मुख्यमंत्री सहाय्यता निधी” योजना – CM Relief Fund Scheme

महाराष्ट्र राज्य सरकारने योजना सुरु केली आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे अंतर्गत राज्यातील तसेच देशातील संकट काळात आपत्तीग्रस्तांना तातडीने सहाय्यता देणे, तसेच पूर, दुष्काळ, आगीमुळे होणारे अपघात अशा मोठ्या नैसर्गिक आपत्तींमुळे बाधीत नागरिकांना अर्थसहाय्य पुरवणे हे उद्दिष्ट आहे.

मदत कोणाला मिळते?

महाराष्ट्रातील ज्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे , अशा सगळ्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो .
लाभाचे स्वरूप : अपघात किंवा उपचारखर्च किती होतो आहे , त्याच्या प्रमाणानुसार साधारण ३ हजारांपासून ते ५० हजारांपर्यंत आर्थिक मदत या योजनेअंतर्गत दिली जाते .

आवश्यक कागदपत्रे :

★ वैद्यकीय खर्चाचे प्रमाणपत्र ( खासगी रुग्णालयात वैद्यकीय खर्च एक लाख रुपयांहून अधिक असल्यास शासकीय रुग्णालयातील अधीक्षक / जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणित करणे आवश्यक आहे . राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजने अंतर्गत हे रुग्णालय नोंदणीकृत असून या योजनेचा लाभ रुग्णास मिळत नसल्याचे वैद्यकीय खर्चाच्या प्रमाणपत्रावर प्रमाणित करणे आवश्यक आहे .

★ रेशन कार्ड / रहिवासी दाखला / आधार कार्ड

★ तहसिलदारांनी प्रमाणित केलेला उत्पन्नाचा दाखला ( कुटुंबातील सर्व स्रोतांचे मिळून मागील आर्थिक वर्षाचे उत्पन्न एक लाख रुपयांहून कमी असल्याचा )  भ्रमणध्वनी क्रमांक

★ मा . आमदार / खासदारांचे शिफारस पत्र ४ /

रुग्णालयास द्यावयाचा तपशील :

★ बँक खाते क्रमांक
★ रुग्णालयाचे खाते ज्या बँकेत आहे त्या बँकेचे नाव व शाखा
★ रुग्णालय खात्याचे नाव
★ आयएफएससी कोड
★ रुग्णालयाचा इ – मेल .
महत्वाचे – या योजनेंतर्गत , रुग्णाला तीन वर्षांतून एकदाच मदत मिळू शकते .

मदतीचे प्रमाण :
अंदाजित खर्च अर्थसाह्यय
रु .२०,००० / – पर्यंत                रु .१०,००० /
रु .४ ९ , ९९९ / – पर्यंत रु .१५,००० /
रु.९९ , ९९९ / – पर्यंत रु .२०,००० /
रु .२ , ९९ , ९९९ / – पर्यंत रु .३०,००० /
रु .४ , ९९ , ९९९ / – पर्यंत रु .४०,००० /
रु .५,००,००० / – पेक्षा जास्त रु .५०,००० /

२. अपघातामुळे कुटुंबातील कर्ती व्यक्ती मृत पावल्यास , अशा कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीमधून अर्थसाहाय्य करण्यात येते . त्यानुसार ज्यांना कोणतेही विमा संरक्षण नाही , तसेच शासनाकडून किंवा शासनाच्या अन्य योजनांमधून आर्थिक मदत मिळालेली नाही , अशांना ही मदत केली जाते . अशा प्रकरणांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांची शिफारस व पोलीस पंचानामा , शक विच्छेदन अहवाल , मृत्यू प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसह मदतीचे प्रस्ताव तया करण्यात येतात . मदतनिधी योग्य ठिकाणी पोहोचावा यासाठी संबंधित जिल्हाधिकारी त्यात लक्ष घालतात . मदत थेट प्राप्तकर्त्याला दिली जात नाही .

मुख्यमंत्री सहाय्यता निधीबाबतची कार्यपध्दती आरोग्यासाठीच्या शासकीय योजनांचा सुयोग्य वापर होण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये अर्ज करण्यापूर्वी खालील प्रमाणे प्राथम्याने कार्यवाही करावी .

1 ) महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजना ( मोफत उपचार ) : – या योजनेच्या आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास करुन पेशंटला नामतालिकेवरील ( Empaneled ) ( www.jeevandayee.gov.in ) सोबतजिल्हा समन्वयकांचे नाव व संपर्कक्रमांकाची यादी . फोन दवाखान्यात अॅडमिट करावे .

2 ) चॅरिटी हॉस्पीटल ( मोफत / सवलतीच्या दरात ) : – जिल्हयातील चॅरिटी हॉस्पीटलमधील उपलब्ध बेडबाबत माहिती चॅरिटी इन्स्पेक्टर / त्यांचे कार्यालयातून घेवून त्यानुसार रुग्णास चॅरिटी बेड उपलब्ध असलेल्या दवाखान्यात अॅडमिट करावे . ( www.charity.maharashtra.gov.in )

3 ) राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम ( RBSK ) ( मोफत उपचार ) – ०.१८ वर्षे वयापर्यंतच्या पेशंटसाठी या योजनेअंतर्गत मोफत उपचार केले जातात . आपल्या जिल्हयाच्या समन्वयकास फोन करुन योजनेतील दवाखान्यात अॅडमिट करावे .( www.rbsk.gov.in )

मुख्यमंत्री सहाय्यता निधी हा खालील आजरासाठी दिला जातो –

1 ) हृदययरोग ,
२ ) मेंदूरोग ,
3 ) नवजात बालके ,
4 ) मूत्रपिंड प्रत्यारोपण ,
5 ) यकृत प्रत्यारोपण ,
6 ) कर्करोग ,
7 ) अपघात ,
8 ) डायलिसिस ,
9 ) हृदयप्रत्यारोपण ,
10 ) CVA व
11 ) Bone Marrow Transplant

या 11 गंभीर आजारांसाठी उपरोक्त तीनही योजनांचा लाभ मिळ न शकणाऱ्या आणि राज्यातील या योजनेत नोंदणीकृत रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पात्र रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून वैद्यकिय समितीमार्फत तपासून अर्थसहाय्य दिले जाते .

संपर्क क्र . 022-22026948 सविस्तर माहिती व रुग्णालयाची यादी वेबसाईटवर आहे

( cmrf.maharashtra.gov.in ) 

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना , राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम , धर्मादाय रुग्णालये यामध्ये लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा व मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये या प्रयोजनार्थ उपलब्ध सिमित निधीचा यथोचित वापर व्हावा म्हणून उपरोक्त योजनांचा लाभ मिळू न शकणाऱ्या रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून लाभ देण्यात येतो .

रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यानंतर त्या प्रकरणांची शहानिशा करणे शक्य नसल्यामुळे अशा रुग्णांना अर्थसहाय्य देय नाही . राज्याबाहेरील रुग्णालयांवर महाराष्ट्र शासनाचे यंत्रणांचे नियंत्रण नसते . तसेच त्यांचेकडून उपयोगिता प्रमाणपत्र घेणे शक्य होत नसल्यामुळे राज्याबाहेरील रुग्णांलयाना अर्थसहाय्य प्रदान करण्यास प्रतिबंध करण्यात आलेले आहे .

महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना यांचेकडील समितीच्या शिफारशीनुसार व त्यांनी अर्थसहाय्याची शिफारस केल्यास त्या रक्कमेच्या ५० % इतकी रक्कम प्रदान करण्यांत येत आहे .

अर्जासोबत खालील कागदपत्रे जोडावी.

1. अर्ज ( विहीत नमुन्यात )
2. वैद्यकिय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळप्रत डॉक्टरांच्या सही व शिक्यासह ( खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हील सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे आवश्यक आहे . )
3 . तहसिलदार कार्यालयाचा उत्पन्नाचा दाखला ( रु . 1.60 लाख पेक्षा कमी असणे आवश्यक आहे . )
4. रुग्णाचे आधारकार्ड ( महाराष्ट्र राज्याचे )
5. रुग्णाचे रेशनकार्ड ( महाराष्ट्र राज्याचे )
6. संबंधीत आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे .
7. रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी .
8. अपघात असल्यास , FIR किंवा MLC असणे आवश्यक आहे .
9. अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे . अर्थसहाय्याची मागणी ई मेल व्दारे केल्यास अर्जासह सर्व कागदपत्रे PDF स्वरुपात ( वाचनीय ) पाठवून त्याच्या मुळ प्रती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडे टपालाव्दारे तात्काळ पाठविण्यात यावेत . रोटा / एच ००७८ [ २०००-४-२०२२ ] .

Email id aao.cmrf-mh@gov.in

वित्तमाला नुकसान झाल्यास अर्थसाहाय्य देण्यात येते ;

नुकसानीचे प्रमाण मंजूर अर्थसाहाय्य
रु .२५,००० / – पर्यंत रु .३,००० /
रु . २५,००१ / – ते रु . ४ ९ , ९९९ / – पर्यंत रु .५,००० /
रु . ५०,००० / – ते
रु . ९९ , ९९९ / – पर्यंत
रु .१०,००० /
रु .१,४ ९ , ९९९ / –
रु . १,५०,००० / -पर्यंत
रु .१५,००० /
रु . १,५०,००० / – व त्यापेक्षा जास्त रु .२०,००० /

अशा प्रकरणामध्ये अर्थसाहाय्य मंजुरीच्या रकमेमध्ये वाढ व घट करण्याचे सर्व अधिकार मा . मुख्यमंत्री महोदयांना आहेत . अशा प्रकरणामध्ये अर्थसाहाय्य मंजूर करण्यापूर्वी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून पुढील कागदपत्रांची पूर्तता करून घेण्यात येते .
★ जिल्हाधिकाऱ्यांचा स्वयंस्पष्ट अहवाल
★ महसूल अधिकाऱ्याने साक्षांकित केलेला नुकसानीचा पंचनामा
★ बाधित व्यक्तीच्या आर्थिक स्थितीचा तपशील :

३. नैसर्गिक आपत्ती प्रकरणी अर्थसाहाय्य निकष : नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या नागरिकांच्या पुर्नवसनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध प्रकल्पाकरिता वेळोवेळी मा . मुख्यमंत्री महोदयांच्या घोषणेनुसार ‘ मुख्यमंत्री साहाय्यता निधी’तून अर्थसाहाय्य देण्यात येते .

योजना : माझ्यासाठी , समाजासाठी

Spread the love

Leave a Comment