नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकाचा उडणार राजकीय धुरळा! राज्य निवडणूक आयोगा कडून वेळापत्रक जाहीर.

मुबंई
– राज्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांचा बिगुल अखेर वाजला आहे . राज्य निवडणूक आयोगाने आज (ता. 8) या निवडणुकांच्या घोषणा केली. पर्जन्यमान कमी असलेल्या राज्यातील 17 जिल्ह्यांतील 92 नगरपालिका व 4 नगरपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे येत्या काळात नगरपालिका – नगरपंचायतींच्या निवडणुकाचा राजकीय धुरळा उडणार आहे.

 

आजपासूनच (ता. 8) आचारसंहिता लागू….

राज्यात नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका जाहीर झालेल्या जिल्ह्यात आज पासून म्हणजे दि. 8 जुलै पासून आचारसंहिता लागू कारण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत आज नगरपालिका व नगरपंचायत निवडणुका कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे.

 

निवडणुकीचे वेळापत्रक

 

 • 20 जुलै – जिल्हाधिकारी निवडणूक कार्यक्रम जाहीर करतील.
 • 22 ते 28 जुलै – संकेतस्थळावर नामनिर्देशनपत्र भरणे
 • 29 जुलै – छाननी व वैध नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार
 • 4 ऑगस्ट – अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस. उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली जाणार.
 • 18 ऑगस्ट – मतदान
 • 19 ऑगस्ट – मतमोजणी

 

नगरपालिकांच्या निवडणुका वेळापत्रक 

 

‘अ’ वर्ग

भुसावळ (जि. जळगाव), बारामती (जि. पुणे), बार्शी (जि. सोलापूर), जालना (जि. जालना), बीड (जि. बीड), उस्मानाबाद (जि. उस्मानाबाद)

 

ब’ वर्ग

 

 • नाशिक – मनमाड, सिन्नर, येवला
 • धुळे – दोंडाईचा-वरवाडे, शिरपूर-वरवाडे
 • नंदुरबार – शहादा
 • जळगाव– अमळनेर, चाळीसगाव
 • अहमदनगर– संगमनेर, कोपरगाव, श्रीरामपूर
 • पुणे – चाकण, दौंड
 • सातारा – कराड, फलटण
 • सांगली – इस्लामपूर, विटा
 • सोलापूर – अक्कलकोट, पंढरपूर, अकलूज (नवनिर्मित)
 • कोल्हापूर – जयसिंगपूर
 • औरंगाबाद – कन्नड, पैठण
 • बीड – अंबेजोगई, माजलगाव, परळी-वैजनाथ
 • लातूर – अहमदपूर
 • अमरावती – अंजनगाव-सुर्जी

 

क’ वर्ग

 • नाशिक– चांदवड, नांदगाव, सटाणा, भगूर
 • जळगाव – वरणगाव, धरणगाव, एरंणडोल, फैजपूर, पारोळा, यावल
 • अहमदनगर – जामखेड, शेवगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, राहाता, राहुरी
 • पुणे – राजगुरूनगर, आळंदी, इंदापूर, जेजुरी, सासवड, शिरुर
 • सातारा – म्हसवड, रहिमतपूर, वाई
 • सांगली – आष्टा, तासगाव, पलूस
 • सोलापूर – मोहोळ, दुधनी, करमाळा, कुर्डुवाडी, मेंदगी, मंगळवेढा, सांगोला
 • कोल्हापूर – गडहिंग्लज, कागल, कुरुंदवाड, मुरगूड, वडगाव
 • औरंगाबाद – गंगापूर, खुलताबाद
 • जालना – अंबड, भोकरदन, परतूर
 • बीड – गेवराई, किल्ले धारुर
 • उस्मानाबाद – भूम, कळंब, मुरुम, नळदुर्ग, उमरगा, परांडा, तुळजापूर
 • लातूर – औसा, निलंगा
 • अमरावती – दर्यापूर
 • बुलडाणा – देऊळगाव राजा

 

4 नगरपंचायती

 • अहमदनगर – नेवासे
 • पुणे/आंबेगाव – मंचर (नवनिर्वाचित)
 • पुणे/बारामती – माळेगाव बुद्रुक (नवनिर्वाचित)
 • सोलापूर/मोहोळ – अनगर

 

Spread the love

Leave a Comment