माझी कन्या भाग्यश्री योजना, संपूर्ण माहिती जाणून घ्या.

महाराष्ट्रात मुलींचे शिक्षण , आरोग्य यामध्ये सुधारणा करून त्यांच्या उज्ज्वल भविष्याकरिता आर्थिक तरतूद करणे , बालिका भृणहत्या रोखणे , मुलींच्या जन्माबाबत समाजामध्ये सकारात्मक विचार आणणे , बालविवाह रोखणे आणि मुलांइतका मुलींचाही जन्मदर वाढविणे हे उद्देश प्रामुख्याने या योजनेमध्ये आहेत .

लाभ कोणाला : या योजनेमध्ये दोन प्रकारच्या लाभार्थ्यांना लाभ मिळतात .

प्रकार – १ : एकुलती एक मुलगी आहे व मातेने कुटुंबनियोजन केले आहे .

प्रकार – २ : पहिली मुलगी आहे आणि दुसरीही मुलगी झाल्यानंतर मातेने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेली आहे . अशा परिस्थितीत दोन्ही मुलींना प्रकार २ चे लाभ मिळतात . मात्र एक मुलगा व एक मुलगी अशी परिस्थिती असल्यास लाभ मिळत नाहीत .

योजनेसाठी सर्वसाधारण अटी व शर्ती :

* ‘ सुकन्या ’ योजनेचा समावेश नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ या योजनेत करण्यात आल्यामुळे ‘ सुकन्या ‘ योजनेच्या सर्व अटी व शर्ती ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ योजनेमध्ये लागू करण्यात आल्या आहेत . तसेच ‘ सुकन्या ’ योजनेतील मुलींना ‘ माझी कन्या भाग्यश्री ‘ या योजनेमध्ये समाविष्ट करण्यात येत आहे .

* सदर योजना सर्व गटांतील दारिद्र्यरेषेखालील ( BPL ) तसेच दारिद्र्यरेषेच्यावरील ( APL ) ( पांढरे रेशनकार्डधारक ) कुटुंबात जन्मणाऱ्या अपत्यांपैकी दोन मुलींना लागू असेल .

★ सदर मुलीचे / मुलींचे पडील महाराष्ट्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे .

★ बालिका / बालिकांचे जन्म नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहील . + विम्याचा लाभ घेताना भुलीचे वय १८ वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे . तसेच तिने १० दी ची परीक्षा उत्तीर्ण होणे व १८ वर्ष पूर्ण होईपर्यंत अविवाहित असणे आवश्यक आहे .

★ दुसऱ्या प्रसूतीच्या वेळेस जर जुळ्या मुली झाल्या , तर त्या दोन्ही मुली प्रकार- २ प्रमाणे योजनेस पात्र असतील .

★ एखाद्या परिवाराने अनाथ मुलीस दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला त्यांची प्रथम मुलगी मानून या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील . परंतु सदर लाभ प्राप्त होण्यासाठी दत्तक मुलीचे वय ० ते ६ वर्ष असावे .

★ बालगृहातील अनाथ मुलींसाठी ही योजना अनुज्ञेय राहील .

★ प्रकार -१ च्या लाभार्थी कुटुंबास एका मुलीनंतर व प्रकार -२ च्या लाभार्थी कुटुंबास दोन अपत्यांच्या जन्मानंतर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे बंधनकारक

* ज्या लाभधारकाचे खाते जनधन योजनेअंतर्गत असेल त्यांना जनधन योजनेअंतर्गत असणारे लाभ आपोआपच मिळू शकतील

* सदर योजना आधार सोबत जोडण्यात येईल . विहित मुदतीपूर्वी ( वयाची १८ वर्ष पूर्ण होण्यापूर्वी ) मुलीचा विवाह अथवा मृत्यू झाल्यास , या योजनेचा फायदा तिच्या पालकांना होणार नसून , मुलीच्या नावे बँक खात्यात जमा असणारी रक्कम महाराष्ट्र शासनाच्या नावे असणाऱ्या Surplus अकाऊंट किंवा खात्यात जमा म्हणून दर्शविली जाईल .

* भारतीय आयुर्विमा महामंडळ महाराष्ट्र शासनाच्या नावे एक नवीन पॉलिसी

योजना : माझ्यासाठी , समाजासाठी …

Spread the love

Leave a Comment