युगंधर फाउंडेशन संस्थेच्या वतीने ‘ जिल्हा स्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे’ आयोजन, 10 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचा सहभाग!

प्रतिनिधी ( सोलापूर ) : जागतिक सुंदर हस्ताक्षर दिनाचे औचित्य साधून ” युगंधर फाउंडेशन, सोलापूर ” या सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते. सुंदर हस्ताक्षर हा सुंदर व्यक्तिमत्वाचा आरसा मानला जातो ,आजच्या ऑनलाईन शिक्षणाच्या जमान्यात देखील 10वी,12वी असो की शालेय परीक्षा किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षा ती लिखित स्वरूपात घेतली जाते त्यासाठी सुंदर हस्ताक्षर हा मोलाचा दागिना ठरतो.शालेय मुलांच्या मद्ये हस्ताक्षर बाबत जागृती ह्वाव यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे,तसेच पर्यावरण प्रतिज्ञेच्या रुपात पर्यावरण जागृती विद्यार्थ्यांच्या मध्ये साधली जाते.सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यातील शासकीय तसेच खाजगी शाळांमधील सुमारे दहा हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सदर स्पर्धेमध्ये प्रत्यक्ष सहभाग नोंदवला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा प्रा. रेशमा माने यांनी दिली आहे.

जिल्ह्यास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धा ही इ. १ ली ते ३ री, इ ४ थी ते ६ वी व इ ७ वी ते १० वी आशा तीन गटात विभागात घेण्यात आली असून . सदर स्पर्धे सोबतच विद्यार्थ्यांना “पर्यावरण संवर्धानाचा संदेश” ही देण्यात आला आहे. सदर स्पर्धेचा बक्षीस वितरण हे फाउंडेशनच्या द्वितीय वर्धापन दिवशी म्हणजे 21 मार्च रोजी होणार आहे.

                    – प्रा. रेशमा माने ( अध्यक्षा, युगंधर फाउंडेशन, सोलापूर )

दरम्यान सुंदर हस्ताक्षर या स्पर्धेत सहभागी प्रत्येक शाळेतील विद्यार्थ्यांकडून परिपाठास ” पर्यावरण संवर्धन प्रतिज्ञाचे ” सामूहिक वाचन करण्यात आले. नंतर याच प्रतिज्ञाचे सुंदर हस्ताक्षर स्पर्धे अंतर्गत लेखन स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांकडून करण्यात आले आहे. युगंधर फाउंडेशन, सोलापूर या सामाजिक संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Spread the love

Leave a Comment