राज्यात पेट्रोल-डिझेल ‘एवढ्या’ रुपयांनी स्वस्त..! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.

मुबंई : महाराष्ट्र राज्याचे नवनियुक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठीमागे सांगितले प्रमाणे पेट्रोल-डिझेलच्या दरकपातीची घोषणा करीत, राज्यातील जनतेला मोठा दिलासा दिला आहे . आज मंत्रिमंडळ बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. त्यामुळे महागाईने त्रस्त जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.

सरकारने व्हॅट करात कपातिचा घेतलेल्या निर्णयाचे फलित म्हणजे आजची पेट्रोल डिझेल दरातील कपात. आता राज्यात पेट्रोल 5 रुपये तर, डिझेल 3 रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे महागाईतून सामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. पेट्रोल डिझेलचे दर कमी झाल्यामुळे इतर वस्तूंचे दर कमी होतील.

अनेक राज्यांनी पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर व्हॅट कमी केला होता. मात्र महाराष्ट्रात याबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. देशातील अनेक राज्यांनी दर कपात केली होती. मात्र महाविकास आघाडी सरकारने केली नव्हती. तसेच आता राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर लगेचच विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पेट्रोल, डिझेलवरील कर कमी करुन सर्वसामान्यांना दिलासा देण्याबाबत सुतोवाच केले होते.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.