PM Kusum Yojana 2022 : प्रधानमंत्री कुसुम योजने अंतर्गत शेतकऱ्यांना छोटया गुंतवणूकीत मिळणार लाखोचा नफा.

PM Kusum Yojana 2022

PM Kusum Solar Pump Yojana 2022 : केंद्र सरकार व महाराष्ट्र राज्य सरकार यांच्या संयुक्तपणे 2019 पासून प्रधानमंत्री कुसुम योजना (Pradhanmantri Kusum Solar Pump Yojana 2022) रावबविण्यात येत आहे. या योजनेत शेतकऱ्यांना छोटया गुंतवणूकीत लाखोचा नफा मिळणार आहे. या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना सौर पंप लावण्यासाठी अनुदान मिळणार आहे. सदर योजना राबविण्या माघे देशातील वाढते प्रदुर्षण आणि जागतिक तापमानवाढीचा धोका कमी करणे आहे. यासाठी सरकारने सौर ऊर्जा क्षेत्रात भरीव गुंतवणूक करण्याचे ठरविले आहे. सोबतच कुसुम योजनेअंतर्गंत सर्वसामान्य शेतकऱ्यांना उत्पन्नाचे साधन उपलब्ध करून दिले आहे.

कुसुम योजने अंतर्गत अनुदान किती मिळणार?

पंतप्रधान कुसुम योजने अंतर्गंत (PM Kusum Yojana 2022) सरकारकडून लाभार्थी व्यक्ती ला या योजनेत सहभागी झाल्यास 60 टक्के अनुदान दिले जाते. या शिवाय गुंतवणूकीच्या 30 टक्के लोन बँककडून मिळण्याची व्यवस्था आहे .

शेतकऱ्यांची गुंतवणूक किती?

सदर योजनेच्या भागभांडवला पैंकी दहा टक्के शेतकर्यांना लावावे लागतात. त्यानंतर मोफत विजेचा लाभ घेता येऊ शकतो. यामुळे शेतकऱ्यांला इतरांवर अवलंबून राहावे लागत नाही.

शेतकऱ्यांना कमाई कशी होणार?

या योजने अंतर्गत गुंतवणूक करणाऱ्या शेतकऱ्यांची कमाई काशी होणार याबाबत जाणून घेऊ. एखाद्या शेतकऱ्यांकडे पाच ते सहा एकर जमीन असेल तर तो सोलार प्लांट करत कमीत कमी 15 ते 20 लाख युनिट (Electricity Unit) वीज निर्मिती करु शकतो. ही वीज तीन रुपये प्रति युनिटने विकली तरी जवळपास 60 लाख रुपयांची कमाई होऊ शकते. पण इतके मोठं सोलार प्लांट सुरु करण्यासाठी जवळपास 20 लाख रुपयांचा खर्च होतो. पण या योजनेमार्फत तुम्ही वर्षाला 40 लाख रुपयांपर्यंत कमाई करु शकता. तसेच शेतकरी विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण होतो.

अर्ज कुठे आणि कसा कराल?

1. पीएम कुसुम योजनेसाठी (PM Kusum Yojana 2022) अर्ज करण्यासाठी https://mnre.gov.in/ या सरकारी अधिकृत संकेतस्थाळावर जावे
2. यामध्ये प्रॉपर्टी, आधार कार्ड आणि बँक डिटेल्सची माहिती भरावी
3. महत्वाचं म्हणजे, तुमची जमीन वीज उपकेंद्रांच्या पाच किलोमीटरच्या आतमध्ये हवी. तेव्हाच तुम्हाला पीएम कुसुम योजनेचा लाभ घेता येईल.

Spread the love

Leave a Comment