मुबंई | बातमी.IN टीम

राज्यात सध्या शिवसेना कोणाची यावरून उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात जोरदार सत्तासंघर्ष सुरु असून दोन्ही कडून याबाबत सुप्रीम कोर्टात परस्पर याचिका दखल कारण्यात आल्या आहेत. समंध राज्याचे, देशाचे लक्ष लागून राहिलेल्या या सत्तासंघर्षावर आज सहा याचिकावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. नेमक्या कोणत्या सहा याचिका आहेत त्या जाणून घेवू.

 

सुप्रीम कोर्टात कोणत्या याचिका ?

याचिका क्र. १

१६ बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा उपाध्यक्षांच्या नोटिशीला एकनाथ शिंदे यांचं आव्हान

याचिका क्र. २

एकनाथ शिंदेंना सरकार स्थापनेचं निमंत्रण देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला सुभाष देसाईंचं आव्हान

याचिका क्र. ३

विधानसभा अध्यक्षांच्या निवडीला सुभाष देसाई यांचं याचिकेद्वारे आव्हान

याचिका क्र. ४

शिंदे सरकारच्या बहुमत | चाचणीला आव्हान | देणारी सुनील प्रभू यांची याचिका

याचिका क्र. ५

शिवसेनेच्या १४ आमदारांना अपात्रतेची | नोटीस बजावण्याच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

याचिका क्र. ६

भरत गोगावले यांच्या व्हिपला मान्यता देण्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला शिवसेनेचं आव्हान

वरील सहा याचिकावर सुनावणी आज सुप्रीम कोर्टात होणार आहे. त्रिसदस्य खंडपिठ सदर सुनावणी करणार आहे.

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.