संभाजीराजे शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून राज्यसभेत जाणार.

मुबंई : राज्यसभा निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालेला आहे. संभाजी महाराज यांची राज्यसभेची टर्म संपलेली आहे. आता ते पुन्हा अपक्ष म्हणून राज्यसभा निवडणूक लाडवण्याचे ठरवले होते व सर्व पक्षांनी आपल्याला मदत करण्यासाठी त्यांनी अहवान करीत प्रत्यक्ष भेटी घेतल्या होत्या. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची ही भेट घेतली होती. मात्र शिवसेनेने पक्ष प्रवेशाची अट घातली होती. त्यानंतर बरीचशी खलबत होत आज अखेर त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून उमेदवारी देण्याचे ठरले आणि त्यानुसार संभाजीराजे पुरस्कृत म्हणून राज्यसभेत जाणार आहेत.

दरम्यान संभाजीराजे यांनी महाराष्ट्रातील आमदारांना आपल्याला मतदान करण्यासाठीचे एक अहवान करणारे पत्र लिहिले होते. त्यानंतर त्यांनी शिवसेना प्रमुखांना भेट घेऊन आपल्याला राज्यसभेसाठी अपक्ष उमेदवार म्हणून पाठींबा देण्यासाठी विनंती केली, मात्र त्यांना पक्षात येण्याची ऑफर देण्यात आली. मात्र संभाजीराजे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यार ठाम होते. आज शेवटी त्यांना शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषित कारण्यात आले.

महाविकास आघाडीतील इतर घटक पक्षांनीही संभाजीराजे यांच्या या उमेदवारीला सकारात्मकता दाखवत पाठिबा दर्शवीला आहे. त्यामुळे संभाजीराजे यांचा राज्यसभेचा मार्ग पुन्हा एकदा सुकर झाला आहे.

Spread the love

Leave a Comment