ज्येष्ठ साहित्यिक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ साहित्यिक-समीक्षक डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. वयाच्या 75 व्या वर्षी त्यांनी आज शेवटचा श्वास घेतला. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले हे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु म्हणून काम पहिले. तसेच अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष पद ही त्यांनी भूषवले होते. त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

बीड येथील महाविद्यालयात १९७१ ते १९७७ या काळात मराठीचे अधिव्याख्याता म्हणून काम केल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये त्यांनी अधिव्याख्याता आणि प्रपाठक या पदांवर १९७७ ते १९९६ या काळात काम केले.

नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी मुखेड (जि. नांदेड) या गावी झाला होता . महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करीत त्यांनी पुढे देगलूर येथे झाले. बी.ए. आणि एम.ए. या दोन्ही

पदव्या संपादित केल्या. डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी ‘शंकर पाटील यांच्या साहित्याचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शोधप्रबंध लिहून त्यांनी १९८० साली पीएच.डी. पदवी संपादन केली.

Spread the love

Leave a Comment