ब्रेकिंग बातमी – शाहरुख खानच्या मुलाला ड्रग्ज प्रकरणात क्लीनचिट!

मुबंई – क्रूझ ड्रग्ज प्रकरणी अटक करण्यात आलेला बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (NCB) शुक्रवारी क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट दिली आहे. एनसीबीने 14 जणांविरुद्ध मुंबई न्यायालयात आरोपपत्र दाखल केले, ज्यामध्ये आर्यन खानचे नाव वगळण्यात आले होते. सदर प्रकरणात आर्यन खानला 26 दिवसांच्या प्रदीर्घ कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाने 28 ऑक्टोबरला जामीन मंजूर केला. त्याचवेळी, तब्बल 7 महिन्यांनंतर शाहरुख खानच्या मुलाला क्लीन चिट मिळाली आहे.

दरम्यान अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत 14 लोकांविरुद्ध आरोपपत्र दाखल करण्यात आले. मात्र, पुराव्याअभावी 6 जणांविरुद्ध तक्रार दाखल झालेली नाही. यामध्ये आर्यन खान व्यतिरिक्त अवीन शाहू, गोपाल जी आनंद, समीर सैघन, भास्कर अरोरा आणि मानव सिंघल यांच्याविरुद्ध पुराव्याअभावी आरोपपत्र दाखल करण्यात आलेले नाही. या प्रकरणात तपास यंत्रणानी आपल्या अहवालात आर्यनने ड्रगस घेतले नाही असे नमूद केले आहे. 

Spread the love

Leave a Comment